Download App

Ghatkopar Hoarding Collapse मध्ये 24 वर्षीय तरूणाचा करूण अंत; कुटुंबाने गमावला एकमेव आधार

Ghatkopar Hoarding Collapse ओळख पटलेल्या मृतांमध्ये 24 वर्षीय भरत राठोड या तरुणाचा मृत्यू. त्याच्या कुटुंबाने एकमेव आधार या गमावला आहे.

Ghatkopar Hoarding Collapse 24 years old youngster dead : सोमवारी अचानक आलेल्या पावसाने मुंबईला जोरदार तडाखा दिला. त्यामध्ये अक्षरशः आभाळ कोसळलं आणि मुंबई हादरली. त्यात वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने ( Ghatkopar Hoarding Collapse ) घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 74 लोकांना वाचविण्यात आले आहे. त्यात ओळख पटलेल्या मृतांमध्ये एका 24 वर्षीय तरूणाचा ( youngster dead ) करूण अंत झाला.

24 वर्षीय तरूणाच्या मृत्यूने कुटुंबाने आधार गमावला…

यामध्ये ओळख पटलेल्या मृतांमध्ये 24 वर्षीय भरत राठोड या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो मेडिकलमध्ये डिलिव्हरीचा काम करत होता. यादरम्यान पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोल पंपवर तो गेला असताना हे भलं मोठं होर्डिंग वादळाने कोसळलं. अन् त्याच्यावर अनपेक्षित पणे काळाने घाला घातला. तो घाटकोपर पश्चिममधील गोळीबार रोड परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरात कमावणारा तो एकटाच होता. कोरोनामध्ये त्याच्या आईचं निधन झालं होतं. तर नुकतेच त्याचे वडील आजारपणातून बाहेर पडले होते. मात्र या दुर्घटनेमध्ये त्याच्या कुटुंबावर मोठं संकट ओढावलं. त्यांचा एकमेव आधार या कुटुंबाने गमावला आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एका आरोपीला हरियाणातून अटक

भरत राठोड या तरूणाप्रमाणेच आणखीही काही मृतांची ओळख पटली आहे. तर या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 74 लोकांना वाचविण्यात आले आहे. तरी देखील अजूनही काही मृतदेह या ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशी माहिती एनडीआरएफने दिली. दरम्यान, राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राऊतांचं थेट PM मोदींना पत्र; ‘त्या’ ८०० कोटींच्या घोटाळ्यात CM शिंदेच लाभार्थी?

या दुर्घटनेप्रकरणी शहरातील पंतनगर पोलीस ठाण्यात जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या जागेत हा अनधिकृत होर्डिंग लावण्यात आला होता. या परिसरात आणखीही काही ठिकाणी अनधिकृत होर्डिंग आहेत त्यावर महापालिकेने कारवाईस सुरुवात केली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जखमींचा उपचाराचा खर्च सरकार देणार आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही अधिक तपास करण्यात येत आहे.

follow us