धक्कादायक! Gadar 2 पाहायला गेला अन् तरूणाने थिएटरमध्येच घेतला अखेरचा श्वास

धक्कादायक! Gadar 2  पाहायला गेला अन् तरूणाने थिएटरमध्येच घेतला अखेरचा श्वास

Gadar 2 Youngster Dead in Theater : ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाला सनी पाजीचे चाहते सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर 2’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. चित्रपट दमदार कमाई देखील करत आहे. मात्र यामध्येच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गदर 2 पाहायला गेलेल्या एका तरूणाचा थिएटरमध्येच मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पटेलांचा दावा बावनकुळेंचा नियमांसह दाखला; अजितदादा महिनाभरात होणार NCP चे अध्यक्ष?

तरूणाला थिएटरमध्येच ह्रदयविकाराचा झटका…

सध्या चाहते देशभरात गदरवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यात उत्तर प्रदेशमध्ये एक वाईट घटना घडली आहे. लखीमपुरातील खीरी भागात एका थिएटरमध्ये ‘गदर 2’ (Gadar 2) च्या शो दरम्यान चित्रपट पाहायला आलेल्या एका तरूणाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचा थिएटरमध्येच मृत्यू झाला आहे. अक्षत तिवारी असं या तरूणाचं नाव असून तो 32 वर्षांचा आहे.

शनिवारी संध्याकाळी हा तरूण 7.50 वाजता लखीमपुरातील खीरी भागातील ‘फन’थिएटरमध्ये ‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपट पाहायला गेला होता. त्यावेळी त्याला एक फोन आला. तो फोनवर बोलत थिएटरच्या बाहेर गेटजवळ गेला. त्यावेळी त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर लोकांनी त्याला रूगणालयात दाखल केले पण त्याचा मृत्यू झाला.

उध्दव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता एन.डी. स्टुडिओ, त्यासाठी देसाईंना धमक्या; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

दरम्यान या थिएटरच्या सीसीटीव्हीमध्ये या तरूणाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं वाईट क्षण कैद झाले आहेत. त्यानंतर हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुसरीकडे ‘गदर 2’ने (Gadar 2) तिसऱ्या विकेंडलाही दमदार कमाई केली आहे. यावेळी चित्रपटाने 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. काल रिलीजच्या तिसऱ्या रविवारी चित्रपटाने 16. 10 कोटींचा कमाई केली. त्यामुळे आता ‘गदर 2’चा एकुण कमाई 456 कोटी झाली आहे. चित्रपट लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर ‘गदर 2’ हा सर्वात जास्त वेगात 450 कोटी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube