Download App

हायकोर्टाने समीर वानखेडेंना फटकारले; ‘केससंबधी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रसिद्ध करू नका’

Sameer Wankhade, Aryan Khan drugs case : आर्यन खानच्या खंडणी प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआयला वानखेडे यांच्या याचिकेवर 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती एमएम साठे यांच्या खंडपीठाने सीबीआयला वानखेडे यांच्या विरोधात कोणतीही सक्तीची पावले उचलू नयेत असे निर्देश दिले आहेत. तसेच वानखेडेंनी देखील खटल्याशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रसिद्ध करू नये आणि कोणतेही प्रेस स्टेटमेंट करू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये, असे आदेश दिले आहेत.

सीबीआयच्या एफआयआरमधील खंडणीच्या आरोपाचा प्रतिकार करताना समीर वानखेडेंनी अभिनेता शाहरुख खानशी केलेल्या कथित चॅटचा हवाला दिला होता. समीर वानखेडेंच्या वकीलांनी असा युक्तिवाद केला की शाहरुख खानने वानखेडेंच्या कामाची प्रशंसा केली होती. जर खरोखरच आर्यन खानला सोडण्यासाठी आर्थिक मागणी केली असती तर अशी प्रशंसा झाली नसती.

Wrestlers Protest : ‘आम्ही तयार पण…’ कुस्तीपटूंनी स्विकारलं बृजभूषण सिंह यांचं ‘ते’ आव्हान

सध्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी सीबीआयने त्यांच्या आणि इतर पाच जणांविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 2021 च्या कॉर्डेलिया क्रूझ शिप प्रकरणात अटक झालेल्यांच्या कुटुंबीयांकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप एजन्सीने वानखेडेंसह पाच जणांविरुद्ध ठेवला आहे.

काय सांगता! नवरदेव भरमंडपातून पळाला, नवरीचाही 20 किलोमीटर पाठलाग…

काल समीर वानखेडेने सांगितले होते की, मला आणि माझ्या पत्नीला गेल्या 4 दिवसांपासून धमक्या येत आहेत आणि सोशल मीडियावर अश्लील मेसेज येत आहेत. या सोबतच मी आज मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विशेष संरक्षणाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 4 दिवसांपासून सतत काही धमक्या येत आहेत, त्याबाबत मी मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती देणार आहे.

Tags

follow us