Wrestlers Protest : ‘आम्ही तयार पण…’ कुस्तीपटूंनी स्विकारलं बृजभूषण सिंह यांचं ‘ते’ आव्हान
Wrestlers Accept Brijbhushan Sharan Singh challenge : लैंगिक शोषणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेलेले भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान बृजभूषण शरण सिंह यांनी मोठ वक्तव्य केलं. त्यांनी कुस्तीपटूंसमोर एक अट ठेवली आहे. बृजभूषण म्हणाले की, मी नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ, करायला तयार आहे. मात्र माझी एक अट आहे की, माझ्यासोबत कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांची देखील टेस्ट करण्यात यावी. जर ते टेस्टसाठी तयार असतील तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तशी माहिती द्यावी. असं बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्यानंतर आता कुस्तीपटुंनी बृजभूषण शरण सिंह यांचं नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ चाचणी करण्याचं आव्हान स्विकारलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांना प्रत्युत्तर देताना कुस्तीपटू बजरंग पुनियानं म्हटले की, आम्ही तर या आधीच सांगितलं आहे. ते आता म्हणत आहेत. असं म्हणते पुनिया नार्कोटेस्टसाठी तयार झाला आहे.
Pune Cyber Crime : ‘मॅट्रिमोनियल’ साईटवर भावी पतीचा शोध पडला महागात, तरुणीला घातला लाखोंचा गंडा
पण यावेळी बंजरंग पुनिया याने देखील एक अट घातली आहे. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण माझ्यासोबत विनोद तोमर, जितेंद्र (महिला कुस्तीपटूंचे मुख्य प्रशिक्षक), फिजिओ धीरेंद्र प्रताप यांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. तसेच ज्या मुली बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत आहेत त्या तर अनेक दिवसांपासून आमची नार्को टेस्ट करा अशी मागणी करत आहेत.
IIM मध्ये शिकला, मोठ्या पॅकेजची ऑफर धुडकावली; शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करत मुलगा सैन्यात अधिकारी
गेल्या काही दिवसांपूर्वी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसह अनेक कुस्टीपटूंनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं.
Jayant Patil यांची ईडी चौकशी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरूद्ध लैंगिक शोषणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्या विरोधात हे पहिलवान मैदानात उतरले होते. दरम्यान कुस्तीपटूंच्या तक्रारी सोडवण्याच्या पहिल्या टप्प्यात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते.
‘नार्को टेस्ट करायला तयार पण…,’ बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटुंना घातली अट
मात्र आता पुन्हा दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी सोमवारी पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आता आहे. मात्र जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचा पवित्रा कुस्तीपटुंनी घेतला आहे.
दरम्यान महिला कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना पत्र लिहून न्यायासाठी मदतही मागितली आहे. कुस्तीगीर संघर्ष समितीने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांकडून आम्ही महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केला आहे. महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांनी कुस्तीपटूंवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. अनेक वेळा कुस्तीपटूंनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) शक्तीने कुस्तीपटूंचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.”