Honey trap case nashik fir register: नाशिमधील हनी ट्रॅपचे (Honey trap case nashik) प्रकरण अधिवेशनात गाजले होते. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा विषय उचलून धरला होता. काही अधिकारी व राजकीय नेते यात अडकल्याचा दावा पटोले यांचा होता. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याचा दिवशी या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील जामनेरमधील प्रफुल लोढाविरुद्ध मुंबईत पोस्को कायद्यानुसार बलात्कार व हनी ट्रॅप प्रकरणात वेगवेगळे गुन्हा नोंदविण्यात आलेत. 62 वर्षीय प्रफुल लोढा (Praful Lodha) याला अटक करण्यात आली आहे. हा प्रफुल लोढा हा जळगावमधील एका मंत्र्यांच्या जवळचा असल्याची चर्चा सुरू आहे. लोढाने भाजपमध्ये प्रवेश केलेला असून, त्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर एक फोटोही आहे.
लोढाला अटक, घर झडतीत वस्तूही पकडल्या
प्रफुल लोढा याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी जळगाव, जामनेर, पाहूर येथील लोढा याच्या घराची झडती घेतली. त्यात लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पोलिसांनी जप्त केले आहेत.
नोकरीच्या अमिषाने 16 वर्षीय मुलीवर अत्याचार
प्रफुल लोढाचा मुंबईतील चकाला परिसरात चकाला हाऊस नावाने बंगला आहे. याच बंगल्यावर नोकरीचे अमिष दाखवून 16 वर्षीय मुलगी व तिच्या मैत्रिणीवर अत्याचार करून अश्लिल छायाचित्र काढले. हे छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत घरात डांबुन मारहाण केल्याप्रकरणी साकीनाका पोलिस स्टेशनला प्रफुल लोढाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तर 5 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आलीय. त्यानंतर 14 जुलै रोजी लोढावर अंधेरी एमआयडीसीला दुसराही एक गुन्हा नोंदविण्यात आलाय. या पोस्को, बलात्कार खंडणीसह, हनी ट्रॅपचे कलमे लावण्यात आले आहेत.
जुबान काट लो लहजा… वैर माझ्याशी मग माझ्या जिल्ह्याची बदनामी का? धनंजय मुंडेंचा शाहरीतून विरोधकांना सवाल
लासलगावमध्ये लोढाविरुद्ध गुन्हा
तथ्याकथीत समाजसेवक म्हणून वागत असलेल्या प्रफुल लोढाचे जळगावमधील अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. परंतु या लोढाविरुद्ध नाशिकमधील लासलगाव पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. जामनेरच्या माजी नगराध्यक्षाच्या चुलत भावाचे श्रीरामपूर येथील मुलीसोबत विवाह झाला होता. परंतु लग्नाच्या अवघ्या महिन्याभरात मुलगी आईसोबत निघून गेली. त्यानंतर मुलीच्या आईने माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याविरुद्ध मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा मागे घेण्यासाठी मुलीच्या आईने ललवाणी यांच्याकडे 25 लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम लासलगाव येथील एका लॉजमध्ये देण्याचे ठरले. पपारस ललवाणी यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईला खंडणीची रक्कम घेताना पकडण्यात आले. या प्रकरणी महिलेविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. त्यात प्रफुल्ल लोढाचा सहभाग आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.