जुबान काट लो लहजा… वैर माझ्याशी मग माझ्या जिल्ह्याची बदनामी का? धनंजय मुंडेंचा शाहरीतून विरोधकांना सवाल

जुबान काट लो लहजा… वैर माझ्याशी मग माझ्या जिल्ह्याची बदनामी का? धनंजय मुंडेंचा शाहरीतून विरोधकांना सवाल

Dhananjay Munde on opposition for Alligation on him and also Beed : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार नवपर्वाचा हा संवाद मेळावा सुरू आहे. यांतर्गत परभणी येथे आयोजित संवाद मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते. त्यावेळी आपल्या भाषणामध्ये ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बीडमध्ये विरोधकांनी केलेल्या आरोपांवर बोलले आहेत. ते म्हणाले की, माझ्याशी वैर होतं पण माझ्या जिल्ह्याची बदनामी का केली? असं म्हणत यावेळी मुंडेंनी विरोधकांना शायरीतून उत्तर दिलं आहे.

अमिताभ बच्चनच्या डॉनचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कायम म्हणाले धनंजय मुंडे?

मी आज बोलणार नव्हतो. पण इथे मी बीडचा आगळावेगळा इतिहास आपल्या या संघटनेच्या माध्यमातून वाचून दाखवणार आहे. आज अनेक दिवसांनंतर तटकरे साहेबांचं आगमन या जिल्ह्यामध्ये झालं आहे. त्यामुळे मी सर्वाच्या वतीने त्याचं बीडमध्ये स्वागत करतो. त्यांना ज्या आपेक्षा आहेत त्या पुर्ण होतील. आज मी तब्बल 200 दिवसांनंतर बोलतोय त्यामुळे माझी न बोलण्याची डबल सेन्चुरी झाली आहे. या 200 दिवासांमध्ये माझ्यासह माझ्या जिल्ह्याची झालेली बदनामी मला जव्हारी लागली आहे. ही बदनामी करणारा जिल्ह्यातील असो किंवा जिल्ह्याबाहेरील असो त्यांना मला एकच सांगायचं आहे की, जर वैर माझ्याशी होतं तर मग बदनामी माझ्या मातीची का केली?

ठाकरे बंधुंच्या युतीची चाहूल, शिंदेंचा आधीच मास्टरस्ट्रोक; मनसेचा ‘हा’ नेता हाती घेणार धनुष्यबाण

त्यामुळे गेल्या काही दिवसांत एक घटना, व्यक्ती, जिल्हा, माती, मतदारसंघ बीडची आशा पद्धतीने बदनामी केली. त्यांच्यासाठी मी चार ओळी बोलणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे. तुम्हारी सोच की साचे में ढल नही सकता. जुबान काट लो लहजा बदल नही सकता. अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लौ से हे लोहा पिघल नही सकता. आज अनेक दिवसांनंतर तटकरे साहेबांचं आगमन या जिल्ह्यामध्ये झालं आहे. त्यामुळे मी सर्वाच्या वतीने त्याचं बीडमध्ये स्वागत करतो. त्यांना ज्या आपेक्षा आहेत त्या पुर्ण होतील असं अश्वासन देत यावेळी मुंडे यांनी आपलं भाषण संपवलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube