धडाकेबाज तुकाराम मुंढे अडचणीत, नियमबाह्यपणे कंत्राट दिल्याचा ठपका

IAS Tukaram Mundhe : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर दोन प्रकरणांमध्ये गैरकारभाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी एका महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. तीन वर्षांमध्ये तक्रारदार महिलेला न्याय मिळाला नसल्याने जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या प्रकरणात […]

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

IAS Tukaram Mundhe : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर दोन प्रकरणांमध्ये गैरकारभाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी एका महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. तीन वर्षांमध्ये तक्रारदार महिलेला न्याय मिळाला नसल्याने जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसऱ्या प्रकरणात निमयबाह्यपणे कंत्राट दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी 20 कोटींचं एक कंत्राट नियमबाह्यपणे दिले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश माहिती आयुक्तांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

कांदा खरेदीचा निर्णय ऐतिहासिक, मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार

कोरोना काळामध्ये तुकाराम मुंढेंनी नागपूरमध्ये कठोर उपाययोजना केल्या होत्या. अनेक अधिकाऱ्यांना खडसावले होते. त्याच काळात एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंढेंची बदली झाली. नागपूरमध्ये माझ्या विरोधात काही मिळत नाही, म्हणून चारित्र्यहनन केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप तुकाराम मुंढेंनी केला होता.

कंत्राटदार प्रकरण आणि महिलेची तक्रार या दोन्ही प्रकरणांमध्ये तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाई होते का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

‘शेतकरी थांबायला तयार पण, केंद्र सरकारने.. कांदाप्रश्नी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला

तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या कृषी विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी आहे. 21 जुलै रोजी राज्यातल्या 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी विभागाची अतिरिक्त जबाबदारी मिळाली होती. भाषा विभागाचं सचिवपद मुंढेंकडेच आहे.

Exit mobile version