Download App

घोषणा देणं चुकीचं असेल तर आम्ही.., जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांनाही सोडलं नाही

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देणं चुकीचं असेल तर आम्ही पोलिस ठाण्यात घुसून घोषणा देऊ, अशा इशारा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. कळव्यामध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्याबद्दल जो गुन्हा दाखल केला तो अत्यंत चुकीचा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. शिवजयंती साजरी करणारी सर्व बहुजन समाजातील पोरं आहेत. त्यांना प्रोत्साहन देणं तुमचं काम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे ठाणं आहे. त्यांच्या ठाण्यातच असा प्रकार घडत असेल अवघड असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

आरारारा…खतरनाक! प्रविण तरडेचे इस्टा हॅक

यह पब्लिक है..,सब जानती है, रोड शोमध्ये देवेंद्र फडणवीसांचा टोला

प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करा, जर घोषणा देणे गुन्हा असेल तर आम्हीही पोलिस ठणयात घुसून घोषणा देऊ असा इशारा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

राज्यसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे फडणवीसांकडून कौतुक

ठाणे पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो मला खूप कौतुक वाटतं अत्यंत कार्य तत्पर असं त्यांचं हे वागणं आहे कोणीही गुन्हा दाखल केला की पाच मिनिटात गुन्हा दाखल करून घेतात कायद्यामधल्या सगळ्या तरतुदी शोधतात आणि लगेच गुन्ह्याची नोंद करतात.

Thackeray Vs Shinde : पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला, आज कोर्टात काय घडलं?

त्याची कॉपी समोरच्याच्या हातात देतात हे अत्यंत कौतुकास्पद आहे ती कॉपी लगेच टीव्हीवर दाखवली जाते प्रचंड निष्ठा वान असा कारभार आहे. मात्र, हाच न्याय जो आहे तो आमच्या बाबतीत लावण्यात येत नाही तो आमच्या बाबतीत सुद्धा दाखवावा हवं तर आम्हाला कॉपी देऊ नका.

पण गुन्हा तर दाखल करा अशी उपहासात्मक टीका जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याच्याबद्दल केली आहे. एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसऱ्या न्याय हे योग्य नव्हे असंही त्यांनी म्हंटलं आहे.

Tags

follow us