यह पब्लिक है..,सब जानती है, रोड शोमध्ये देवेंद्र फडणवीसांचा टोला

यह पब्लिक है..,सब जानती है,  रोड शोमध्ये देवेंद्र फडणवीसांचा टोला

पुणे : यह पब्लिक है, सब जानती है, कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाहीच, असा नारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नूकताच कसब्यातील रोडवर देवेंद्र फडणवीसांनी रोड शो केला आहे. यावेळी छोटेखानी सभा घेत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले, एमपीएससीचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झाला होता. सत्तेत असताना एमपीएससी विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला नाही. एमपीएससीच्या प्रश्नाचं मविआने राजकारण केलं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय करुन दाखवला असल्याचं फडणीसांनी ठामपणे सांगितलं आहे.

Devendra Fadanvis : शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार

आम्ही सरकार खुर्च्या तोडण्यासाठी चालवत नसून द्वेषापेक्षा राज्याच्या विकासाच्या कामांवर भर देत असल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच कसब्यातील ब्राम्हण समाज अफवा पसरवल्या जात आहेत. कसब्यातील संपूर्ण ब्राम्हण समाज भाजपच्या पाठीशी आहे. आता ही लढाई राष्ट्रवाद आणि हिंदुत्वादाची असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

भावी महिला मुख्यमंत्री पोस्टरवरुन Supriya Sule संतापल्या; म्हणाल्या महिलेचा फोटो…

सत्तेत असताना महाविकास आघाडी सरकारकडून मतांचं राजकारण केलं जात होतं, मात्र, सत्तेत आल्यानंतर आता पुण्यात मोठ्या प्रमाणात काम सुरु आहेत. जनतेने पुण्याची संस्कृती जपायला हवी, आणि परिवर्तन घडवून आणावं, असं आवाहनही त्यांनी पुणेकरांना केलंय.

येदियुरप्पा यांनी घेतला राजकीय संन्यास, निरोपाच्या भाषणात म्हणाले, पुन्हा BJP सत्ता येणार

आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा कानमंत्र दिला असून पुण्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटायला हवेत, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये वावरणारा कार्यकर्ता हेमंत रासनेंना मतदान करण्याच आवाहनही त्यांनी केलंय.

दरम्यान, या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube