IIT Bombay Secret Donation आयआयटी बॉम्बेला (IIT Bombay) गुणवत्ता आणि जॉब प्लेसमेंटसाठी ओळखले जाते. हे देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. या काँलेजमध्ये अॅडमिशनसाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. मात्र यावेळी आयआयटी बॉम्बे वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. IIT बॉम्बेला सुमारे 160 कोटी रुपये देणगी (IIT Bombay Secret Donation) मिळाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देणगीदार कोण हे अद्याप कळलेले नाही.
असे अमेरिकेत घडते
आयआयटी बॉम्बेचे संचालक प्राध्यापक सुभाषिस चौधरी यांनी या देणगीबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की संस्थेला 160 कोटींची देणगी मिळाली आहे. हा अज्ञात देणगीदार महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. ते म्हणाले की अमेरिकेत असे घडते परंतु मला वाटते की ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एखाद्या संस्थेला एवढी मोठी रक्कम मिळाली असेल आणि देणगीदाराने आपली ओळख उघड केली नसेल.
Neeraj Chopra : नीरज चोप्राची वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक
नंदन निलेकणी यांनी दिली होती देणगी
यापूर्वी, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांनीही IIT बॉम्बेला गुप्तपणे 85 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मात्र, नंतर ही देणगी कळली. त्यांनी यावर्षी जून 2023 मध्ये 315 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
National Film Awards 2023 : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पुष्पाच्या संगीतकारांचा अनोखा सन्मान!
अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत एकूण 400 कोटी रुपये दिले आहेत. नंदन नीलेकणी यांनी 1973 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. संस्थेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ही देणगी दिली.