Download App

शाकाहारी टेबलावर मांसाहार; IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

  • Written By: Last Updated:

मुंबई : IIT मुंबई ही संस्था नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. येथे घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींची दखल सर्व स्तरातून घेतली जाते. आता पुन्हा ही संस्था चर्चेत आली असून, शाकाहारी टेबलावर मांसाहार केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड ठोठावल्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वसतिगृहातील भोजनालय समितीने बेशिस्त वर्तन व भोजनालयाचे नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Video : “तेवढं पवार साहेबांना सोडू नका”; चिमुकल्याचा अमोल कोल्हेंना ‘कानात’ सल्ला

याबाबत अधिक माहिती अशी की, आयआयटी मुंबईच्या 12, 13 आणि 14 वसतिगृहात काही विद्यार्थी शाकाहारी आणि मांसाहारी असे विभाग केल्याप्रकरणी आंदोलन करत होते. त्यावेळी या गोष्टीचा निषेध म्हणून काही विद्यार्थ्यांनी शाकाहारी विद्यार्थांसाठी राखीव असलेल्या ठिकाणी मांसाहार केला. त्यानंतर संबधित विद्यार्थ्यांविरोधात भोजनालय समितीने कारवाई करत 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय इतर दोन विद्यार्थ्यांवरदेखील शिस्तभंगांची कारवाई केली जाणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

जातीय जनगणनेवरुन केंद्र अन् राज्य भाजपमध्ये विरुद्ध प्रवाह? बावनकुळे आग्रही; मोदींची टीका

घडलेल्या घटनेनंतर याबाबत सुरक्षा विभाग आणि भोजनालय समितीकडे करण्यात आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यात काही विद्यार्थी बळजबरीने शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या टेबलवर मांसाहर करून संस्थेतील वातावरण बिघडवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर समितीकडून एका विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून, अन्य दोन विद्यार्थ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र,  त्यांच्यावरही शिस्तभंगांची कारवाई केली जाणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

खाप पंचायतीशी तुलना

या घटनेनंतर कॉलेजच्या कॅम्पसमधील आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल या विद्यार्थ्यांच्या गटाने सोशल मीडिया पोस्टमध्ये वसतिगृह प्रशासनाच्या कारवाईची तुलना ‘आधुनिक काळात अस्पृश्यता राखण्यासाठी काम करणाऱ्या खाप पंचायती’शी केली आहे. तर, दुसरीकडे आयआयटी मुंबईतील भोजनालय समितीने विद्यार्थ्यांच्या नावाने एक महत्त्वाची नोटीस जारी केली आहे. यात त्यांनी जर कोणत्याही विद्यार्थ्याने कॉलेजच्या फूड पॉलिसीचे पालन केले नाही तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. त्यानंतर आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल APPSC शी संबंधित विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कॉलेजच्या नियमांचा निषेध केल्याचे संस्थेने म्हटले आहे.

Tags

follow us