IT Raid On Uddhav Thackeray MP Rajan Vichare : ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अशी कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नसून, हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज (दि.9) सकाळपासून आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडसत्र चालवले आहे. त्यानंतर विचारे यांच्या घरावरदेखील आयकर विभागाने छापा मारल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. परंतु, आता हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालापूर्वी ठाकरे गटाचे आमदार वायकर यांच्यावर अशा प्रकारे कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Shirur Loksabha Seat : पार्थ पवार आज दिवसभर हडपसरमध्ये : शिरूरचं जवळपास ठरलंय!
जोगेश्वरी प्रकरणात वायकर निशाण्यावर
ईडीने ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घर आणि कार्यलयांवर छापेमारी करण्यात आली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असून, सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचे पथक वायकर यांच्या घरी दाखल झालं आहे. याच भूखंड प्रकरणात सप्टेंबरमध्ये ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 21 डिसेंबर रोजी वायकर यांची साधारण सात ते आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज (दि. 9) त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्र मिळतात का? याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
Sharad Pawar : नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा; पवारांनी व्यक्त केली चिंता
वायकरांवर आरोप काय?
वायकर यांच्यावर मुंबई पालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप आहे. याशिवाय मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकोडो कोटींच्या घोटाळ्याचाही आरोप वायकरांवर करण्यात आला आहे. तसेच पालिकेच्या अख्यत्यारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचे वायकरांवर आरोप असून, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्याखली गावात हे बांधकाम करण्यात आले आहे. तर हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांनी दावा केला आहे.