Download App

मुंबई-गोवा महामार्गावर मनसेच्या महिला आघाडीची गैरसोय, शालिनी ठाकरेंनी सांगितली आपबीती

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) दुरावस्थेवरुन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोलाड (kolad) येथे जाहीर सभा घेतली होती. यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर जोरादार टीका केली होती. त्यापूर्वी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पळस्पे फाटा ते खारपाडा दरम्यान कोकण जागर यात्रा काढली होती. पण जागर यात्रेवरुन परतणाऱ्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांची भरपावसात रात्रीच्या वेळी गाडी बंद पडल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे आक्रमक झालेल्या शालिनी ठाकरे यांनी थेट कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शालिनी ठाकरे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिलेले निवेदनात म्हटले की आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोकण महामार्गासाठी जागर यात्रा आयोजित करण्यात आले होती. ज्या विषयासाठी राज ठाकरे यांनी आंदोलन पुकारले होते त्याचाच अनुभव मला आला. मी व माझ्या महिला सहकारी कोलाड येथील राज ठाकरे यांचे भाषण ऐकून मुंबईच्या दिशेने जात असताना माझ्या गाडीचे सस्पेन्शन खराब होऊन ती बंद पडली. भर पावसात रात्रीच्या अंधारात गाडी बंद पडल्याने आम्ही सर्व महिला भयंकर परिस्थितीत अडकलो होतो.

पंकजा मुंडेंनी वेळ साधली! ‘शिवशक्ती’ नावामागे दडलंय ‘राजकीय कमबॅक’ चं गणित

त्यांनी पुढे लिहिले की रस्त्यावर पथदिवे नाहीत, यंत्रणेशी संपर्क साधण्यासाठी कोणते साधन नाही, आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधा हे सांगणारे फलक नाही, महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत, अपघात झाल्यास प्रथमोपचाराची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आमची अवस्था तशीच झाली होती. या परिस्थितीत आम्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला, अशी आपबीती त्यांनी निवेदनात मांडली आहे.

माझी चांगली दणकट गाडी या रस्त्यावर खराब होऊ शकते तर इतर गाड्यांची काय हाल होत असतील? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. सामान्य चाकरमान्यांच्या लाडक्या एसटी बसची पुरती वाताहात होऊन जात असेल. या खड्ड्यांमुळे बसणाऱ्या दणक्यांनी शारीरिक त्रास होतो तो वेगळाच, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

बावनकुळेंचं प्रेम पुतना मावशीचं; शरद पवारांवरील टीकेवर देशमुखांचं प्रत्युत्तर

अनेक वर्ष या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. जवळजवळ 15,000 कोटी रुपये हा महामार्ग बांधण्यासाठी खर्च करण्यात आले तरीही रस्त्याची दयनी अवस्था आहे व रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. प्रचंड मोठे खड्डे आणि असंख्य खड्ड्यातून वाट काढताना वाहनांची दुर्दशा होतेच पण वाहनांच्या आतील माणसांना शारीरिक इजा सुद्धा होते. हे सर्व कंत्राटदारच्या बेजाबदार व हलगर्जीपणामुळे होत आहे, असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘अजितदादा सोबत आले अन् माझं खातं… महाजनांनी सांगितलं खातेवाटपाचं सत्य

माझ्या व माझ्यासारख्या अनेक गाड्यांची दुर्दशेसाठी, आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या सोयी सुविधांच्या अभावामुळे माझ्यासह माझ्यासोबत असलेल्या सहकारी महिलांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व कंत्राटदारांवर गुन्हा नोंदवा, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी केले आहे.

Tags

follow us