Download App

INDIA Alliance Meeting : …म्हणून इंडियाच्या बैठकीला आलेले राहुल गांधी झाले हॉटेलमधून अचानक गायब

  • Written By: Last Updated:

INDIA Alliance Meeting : देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया आघाडीची (INDIA Alliance Meeting ) स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत काल (दि.31) आणि आज (दि.1) रोजी पार पडत आहे. या बैठकीचा आज समारोप होत आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेतेमंडळी हजेरी लावली आहे. यामध्ये कॉंग्रेस खासदार राहुल गांधी देखील या बैठकीला मुंबईत आलेले आहेत. मात्र यावेळी राहुल गांधी एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण देखील आले होते.

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

राहुल गांधी झाले हॉटेलमधून अचानक गायब…

मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीचं (INDIA Alliance Meeting ) आज अखेरचं सत्र आहे. त्यात सर्व नेते ग्रॅन्ड हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यात राहुल गांधी देखील तेथेच आहेत. मात्र बैठकीचं आज अखेरचं सरू होण्याआधीच राहुल गांधी हॉटेलमधून बाहेर पडले. ते कुठे गेले? कोणत्या कामासाठी गेले? हे कुणालाही माहिती नव्हते. तेसेच ते अचानक असे निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण देखील आले होते. मात्र राहुल गांधी कुठे आहेत हे कळल्यानंतर या चर्चांना पुर्ण विराम मिळाला.

KBC 15 चा पहिला करोडपती बनला २१ वर्षांचा जसकरण! सवालावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

राहुल गांधी क्लिनिकला गेल्याची माहिती…

इंडिया आघाडीच्या बैठकीतून (INDIA Alliance Meeting ) राहुल गांधी असे अचानक गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण देखील आले होते. मात्र त्यानंतर लगेचच ते माहिममधील बनाजी क्लिनिकला गेले असल्याचे समोर आले. ते डोळे तपासायला गेले असल्याचं देखील सांगण्यात आलं. त्याचबरोबर ते गावदेवीला देखील गेले असल्याचं सांगण्यात आलं. एका वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली. तर यानंतर काही वेळाने राहुल गांधी पुन्हा हॉटेल परत देखील आले.

https://youtu.be/5iLK1w52Pm0?si=ctFZ1VS_JihDca6z

मुंबईत होत असलेल्या इंडियाच्या बैठकीत (INDIA Alliance Meeting ) 26 पक्षांचे 80 नेते उपस्थित आहेत. यामध्ये एमके स्टॅलिन, नितीश कुमार, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या पाच मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल हे उपस्थित आहेत. या 80 नेत्यांसाठी मुंबईतील हयात हॉटेलमध्ये 170 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. विमानतळावर राष्ट्रवादी-काँग्रेस सर्व नेत्यांचे स्वागत केले, तर शिवसैनिक हॉटेलवरील व्यवस्थेवर लक्ष देत आहेत. तुतारी आणि नाशिक ढोलताशाच्या गजरात विरोधकांचे स्वागत करण्यात आले.

follow us