Download App

अधिकृत माहिती नाही; CM शिंदे, अजितदादा अंतरवालीत येत असल्यास स्वागत : मनोज जरांगे

  • Written By: Last Updated:

जालना : गेल्या 15 दिवासांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संध्याकाळी अंतरवाली सराटी येथे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांसोबत मंत्रिमंडळातील काही नेतेदेखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत असून, शिंदे आणि अजितदादांच्या आजच्या भेटीबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दोन्ही नेते भेटण्यासाठी म्हणून अंतरवाली सराटी येथे येत असतील तर, त्यांचे स्वागत आहे.  शिंदे अजितदादा आणि जरांगे यांच्यात नेमकी काय चर्चा होते तसेच जरांगे त्यांचे उपोषणा मागे घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजितदादांचा आढळराव पाटलांना धक्का; प्रशासकीय इमारतीवरुन रंगले कुरघोडीचे राजकारण

चंद्रकांत पाटलांना तातडीने बोलवले

चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटलांना तातडीने मुंबईत येण्यास सांगितले आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटील पुण्यातील प्रशासकीय बैठक टाळून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

काय म्हणाले जरांगे पाटील

दरम्यान, काल (दि.12) जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. तसेच काही अटी ठेवल्या होत्या. यात राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आपली भेट घेण्यास यावे असे सांगितले होते. जरांगे पाटलांच्या या अटीनंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संध्याकाळी अंतरवाली सराटी येथे भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील काही नेतेदेखील सोबत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी टाकलेल्या पाच अटीपैकी एक अट पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे.

Video : आरक्षणाबाबत सरकार गंभीर ते बोलून मोकळं व्हायचं: सरकारच्या मनात नेमकं काय?

शिंदे आणि अजित पवारांच्या भेटीबाबत जरांगे यांना विचारले असता ते म्हणाले की, शिंदे आणि अजितदादा भेट देण्याबाबत आपल्याला अधिकृत माहिती नाही. माध्यमांमधूनच ते येत असल्याचे समजत असून, ते येणार असतील तर, त्यांचे स्वागतच आहे. मराठा समाजाने सरकारला वेळ दिलेला आहे. तोपर्यंत आम्ही यावर काही बोलू शकत नाही. दिलेल्या वेळेनुसार आम्ही महिनाभर वाट बघणार असल्याचे जरांगे म्हणाले. काल रात्री शिंदेसोबत फोनवर बोलणे झाले होते. मात्र, या चर्चेदरम्यान भेटीबाबत कोणतीही वेळ किंवा दिवस सांगण्यात आलेला नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : फडणवीस सत्तेत आले अन् राज्यात.. राऊतांचा गंभीर आरोप

जरांगे पाटलांच्या अटी काय?

सरकारला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ देताना पाच अटी टाकल्या आहेत. यात प्रामुख्याने समितीचा अहवाल कसाही येवो आरक्षण द्यावे लागेल. महाराष्ट्रात आंदोलकांवर जेवढे गुन्हे दाखल तेवढे मागे घेणे. लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करणे. उपोषण सोडायला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे आले पाहिजे अशा प्रमुख अटी दिल्या आहेत.

Tags

follow us