Download App

फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावर जयंत पाटील बोलले

ठाणे : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा अन् शहर येत नाही का? असा खोचक सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. तसेच ठाण्यात घडलेला प्रकार गंभीर असून राज्य सरकारने रोशनी शिंदेला तत्काळ संरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.

Devendra Fadanvis फडतुस शब्दांवरुन भडकले : ठाकरेंना थेट धमकीच दिली…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी रोशन शिंदेवर कशी आपबीती बितली हे देखील स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका पत्रकार परिषदेत पत्रकाराला धमकावण्यात आलं होतं. यासंदर्भातील माहिती रोशनी शिंदेंनी प्रसारमाध्यमांना दिली होती. त्यानंतरच त्यांना काही महिलांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला, असल्याचं ते म्हणाले आहेत.

आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस”; ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपचे नेते सरसावले

सत्ताधारी सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याला धमकावणे, मारहाण करणे असे प्रकार महाराष्ट्रात घडणं म्हणजे गंभीर आहे. घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेधही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रोशनी शिंदेला मारहाण केल्याने शिंदे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी रोशनी शिंदेंना संरक्षण दिलं पाहिजे, सोबतच ज्या महिलांनी मारहाण केलीय, त्या महिलांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Shinde-Fadanvis : कांदा अनुदानाच्या निर्णयावरून धनंजय मुंडेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले

दरम्यान, रोशनी शिंदे मारहाण घटनेप्रकरणी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा अन् शहर येत नाही का? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. तसेच हे सरकार कष्टकरी, शेतकऱ्यांचं नसून बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं आहे. सत्ताधारी सरकार यात्रा काढण्याला अधिक महत्व देत असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सक्षम नसल्याचंही त्यांनी म्हटंलयं.

Tags

follow us