Devendra Fadanvis फडतूस शब्दांवरुन भडकले : ठाकरेंना थेट धमकीच दिली…

Devendra Fadanvis फडतूस शब्दांवरुन भडकले : ठाकरेंना थेट धमकीच दिली…

Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे हे राज्याचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा तेव्हाचा कारभार पाहिला तर फडतूस कोण आहे, हे राज्यातील जनतेला चांगले माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्याबाबत जी भाषा वापरली आहे. ती भाषा मलाही समजते, येते. पण मी नागपूरचा असल्याने मी त्या भाषेचा वापर करणार नाही. तुम्ही बोलताना विचार करुन बोला, अन्यथा मला भरपूर गोष्टी माहिती आहेत. मग मी सगळंच बाहेर काढेल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

ठाणे शहरात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ०३) रोजी तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली. राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याची जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशाराच दिला आहे.

आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस”; ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपचे नेते सरसावले – Letsupp

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये गेले आहेत. त्यांचा साधा राजीनामा घेण्याची हिमत ठाकरे यांनी दाखवली नाही. ते आता माझा राजीनामा मागत आहे. त्यांनी माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. मी गृहमंत्री झाल्याने महाविकास आघाडीतील पक्षांची अडचण झाली आहे. हे मी समजू शकतो. पण, मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. तर जे-जे चुकीचे काम करतील त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देखील दिला आहे.

उद्धव ठाकरे हे त्यांच्या सत्ताकाळात जेलमध्ये गेलेल्या दोन मंत्र्याच्या मागे लाळघोटेपणा करतात, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यामागे लाळगोठेपणा करतात. त्यांना माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

(12) Omraje Nimbalkar & Kailas Patil : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ‘बदले की आग’ | – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube