Jitendra Aawhad On Eknath Shinde : ठाण्यातील क्लस्टर योजनेवर स्टे आणल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘ठाण्यातील क्लस्टर लोक किती वर्ष वाच पाहणार आहेत. या योजनेबाबत मी पहिल्यांदा शासनाला सांगितलं. त्याची मान्यता मिळवली. मात्र क्लस्टर म्हणजे काही जणांची घर भरण्याचं काम. असं जे चित्र गेल्या काही दिवसांत निर्माण झालं आहे ते अभिप्रेत नव्हतं. छोट्या-छोट्या लोकांनी ज्यांची घरी अवैध आणि पडिक झालेली आहेत. त्यांना घर मिळावी त्यासाठी ही योजना आणली होती.’
Sanjay Raut : २०२४ साली ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं याच्या याद्या लवकरच तयार करु
‘आता ठाण्यातील क्लस्टर योजना 170 एकर, 200 एकर यातून काहीही होणार आहे. मात्र जर ते 10 हजार स्क्वेअर मीटर असेल तर 100 टक्के होणार. ज्यावेळी यासाठी आम्ही लढा दिला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आमच्या सोबत होते. तेव्हा 10 हजार स्क्वेअर मीटरचा प्लॉट करायचा असं ठरलं होत. मात्र आताच्या 170 एकर, 200 एकर क्लस्टरची निर्मिती अशक्य आहे.’
मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होतो, पण नाना पटोले इतका फिरलो नाही – सुशीलकुमार शिंदे
‘लोकांना पूर्ण होतील असी स्वप्न दाखवा. कारण यातून आज जी पीढी तेथे राहते त्यांच्या चौथ्या पीढीला पहिला फ्लॅट मिळेल. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वकांक्षी अशा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला या सरकारने स्टे दिलाय. त्या लोकांनी घर मिळू द्या. राजकारणात असं वागून चालत नाही. राजकारणात मन, विचार आणि खिसा मोठा लोगतो.’
‘त्यामुळे या भागातील राजकारण्यांनी या क्लस्टर योजनेचा फोरविचार करावा. त्यामुळे मुख्यमंत्री जे या विभागाचे मंत्री आहेत त्यांनी गरिबांच्या भल्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवावा.’ अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने सेंट लॉरेन्स हायस्कूल, डिसोझावाडी येथे दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.