Karuna Sharma on Rupali Chakankar in Dispute with Dhananjay Munde : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने (Family Court in Bandra) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना दोषी ठरविले आहे. दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र, वांद्र कोर्टाने पोटगीबाबत दिलेला निकाल करुणा शर्मांना मान्य नाही. त्यांनी याविरोधात हायकोर्टात (Mumbai High Court) दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.
कोर्टाने पत्नी म्हटलच नाही, करूणा शर्मांना पोटगीचा विषय नाही; मुंडेंच्या वकिलांचे स्पष्टीकरण
याचवेळी माध्यमांसमोर बोलताना त्यांना महिला आयोगाने रूपाली चाकणकरांबाबत विचारण्यात आलं त्यावर त्या भडकल्याचा पाहायला मिळालं. करुणा शर्मा यांना तुम्ही न्याय मागण्यासाठी महिला आयोगात गेला होतात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली.
दिल्लीत कोण मारणार बाजी? Axis My India ने दिला धक्कादायक एक्झिट पोल
त्या म्हणाल्या कोण महिला आयोग कोण रूपाली चाकणकर त्या महिला आयोगात केवळ नेत्यांना पाठीशी झालेल्या बसल्या आहेत. त्यामुळे मी थेट राष्ट्रीय महिला आयोगात दिल्लीत पैसे खर्च करून गेले आहे निवेदन दिलं आहे की, चाकणकरांना महिला आयोगातून हटवा.मी तक्रार करून देखील त्या धनंजय मुंडेंची बाजू मांडतात. तसेच आतापर्यंत त्यांच्याकडे खूप तक्रारी आल्या आहेत मात्र त्यांनी काहीही केलेले नाही. असेही शर्मा म्हणाल्या.
माझ्या मुलावर पोस्ट करण्यासाठी धनंजय मुंडेंचा दबाव, करुणा शर्मांचे गंभीर आरोप
तसेच करूणा शर्मा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, मला पोटगी मिळाली हा माझा विजय आहे. मी कोर्टाचे खूप आभारी आहे. यापूर्वीही औरंगाबाद न्यायालयात माझा विजय झाला होता. आजही निकाल माझ्या बाजूने आला आहे. कोर्टाने मला बायको म्हणून मान्यता दिली. पण, कोर्टाचा हा निकाल मला मान्य नाही. मला पोटगी म्हणून १५ लाख रुपये हवे आहेत. १ लाख ७० हजार रुपये घराचं भाडं आहे. हे भाडे दिले जात नाही. देखभालीचा खर्च दरमहा ३० हजार आहे. दोन लाखांत काय होणार आहे? असा सवाल करुणा शर्मांनी केला.