‘कायद्यानुसार मी कोट्यावधीची मालकीण’; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणुक आयोगाची फसवणूक केली असून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याची कागदपत्रं मी देणार आहे. निवडणुकीच्या आधी सादर […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (7)

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (7)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणुक आयोगाची फसवणूक केली असून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.

मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याची कागदपत्रं मी देणार आहे. निवडणुकीच्या आधी सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे आहे. कायदेशीररित्या दोन बायकांचे पती आहेत. प्रतिज्ञापत्रात पत्नींची संख्या लपवली आहे. तसंच मुलांची संख्या देखील लपवली आहे, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

Arvind Kejriwal : डोक्यावर बंदूक ठेवून विचारले, ‘तुरुंगात जायचे की भाजपमध्ये?’

यावरुन दिसून येतं की धनंजय मुंडे किती खरं बोलतात, ते हरिश्चंद्राचा अवतार आहेत का? हे स्पष्ट होतं, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. त्या पुढं म्हणाल्या की, त्यांच्या विरोधात ज्या केसेस आहेत त्याची संख्याही धनंजय मुंडे यांनी लपवली आहे. एवढी सगळी लपवाछपली केल्यानंतरही धनंजय मुंडे यांना ते निवडून कसे देतात? हेच मला समजत नाही, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

1998 पासून आम्ही एकत्र असून 2004 पासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होतो. आजपर्यंत कोर्टाच्या ऑर्डरमुळे गप्प बसले पण कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी खोटी माहिती दिली आहे. सगळ्या कागदपत्रात मी धनंजय मुंडेंच नाव लावते, असाही दावा शर्मा यांनी केला आहे.

Rahul Gandhi ना घर खाली करायला सांगितले… अन् काँग्रेसने सुरु केली ‘मेरा घर आपका घर’ मोहिम

माझ्या एक कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्ये वारसदार म्हणून धनंजय मुंडेंच नाव आहे. माझ्या पासपोर्टमध्ये आणि माझ्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावर, आधारकार्डवरही धनंजय मुंडेंच नाव आहे. मी धनंजय मुंडेंना घटस्फोट देणार नाही. कायद्यानुसार मी कोट्यावधीची मालकीण असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले.

Exit mobile version