Rahul Gandhi ना घर खाली करायला सांगितले… अन् काँग्रेसने सुरु केली ‘मेरा घर आपका घर’ मोहिम

Rahul Gandhi ना घर खाली करायला सांगितले… अन् काँग्रेसने सुरु केली ‘मेरा घर आपका घर’ मोहिम

नवी दिल्ली : गुजरातमधील सुरत न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेचच लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. आता त्यांना १२ तुघलक लेनमधील घर खाली करण्यास सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसने आता ‘मेरा घर आपका घर’ मोहिम सुरु केली आहे.

राहुल गांधी यांना २२ एप्रिल २०२३ पर्यंत त्यांचा सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. मागील आठवड्यात मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्याच आल्यानंतर लगेचच लोकसभा अध्यक्षांनी त्यांना सदस्य म्हणून अपात्र ठरवले आहे. तर लोकसभा सचिवालयाने त्यांना घर खाली करण्यास सांगितले आहे. या नोटीशीला राहुल गांधी यांनी तात्काळ उत्तर देत मी आपल्या आदेशाचे पालन करेल, असे सांगितले आहे.

मागील आठवड्यात खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलेल्या राहुल गांधी यांना सोमवारी (दि. २९) रोजी त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. काँग्रेस नेत्याशी एकजूट दाखवत पक्षाने आता ट्विटर मोहिम सुरु करत ‘तानाशाह आप कितने घर खाली कराओगे ? हर कांग्रेस कार्यकर्ता का घर राहुल जी का घर है।’ असे म्हणत ‘मेरा घर आपका घर’ मोहिम सुरु केली आहे. ट्विटरवर पक्षाने ‘मेरा घर आपका घर’ या मजकुरासह राहुल गांधींची प्रतिमा देखील पोस्ट केली आहे.

Devendra Fadanvis यांना अश्रू अनावर : गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण बनवायचे… – Letsupp

उत्तर प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय राय आणि त्यांच्या पत्नी यांनी लहुराबीर परिसरातील त्यांच्या घरी एक बोर्ड लावला आहे. ‘तानाशाह आप कितने घर खाली कराओगे ? हर कांग्रेस कार्यकर्ता का घर राहुल जी का घर है।’, असे लिहिले आहे.

तर राहुल गांधी यांनी नोटीशीला उत्तर देताना सांगितले की, मी या नोटिशीचे पालन करणार आहे. १२ तुघलक लेन येथील माझे सरकारी निवासस्थान रद्द केल्याबद्दलचे आपले २७ मार्चचे पत्र मिळाले आहे. त्याबद्दल धन्यवाद. मागील चार वेळा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो. त्याबद्दल जनतेचा मी कायमऋणी आहे. या निवासस्थानाच्या माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube