Download App

मुंबई साखळी बॉम्बस्फोट ; न्यायालयात पुरावे टिकले नाहीत, चूक नेमकी कुणाची? उज्ज्वल निकम यांचा गंभीर सवाल

Lawyer Ujjwal Nikam On Mumbai Serial Train Blasts Case : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Bomb blast) प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निर्दोष मुक्त केल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. या निर्णयामुळे तब्बल 19 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला वेगळं वळण मिळालं. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोक्काचे आरोपी भाजपला चालतात? रविंद्र चव्हाण म्हणाले, राष्ट्रीयत्व जागं असलेले सर्वजण…

मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट

याप्रकरणी माध्यमांसोबत बोलताना कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय की, मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचं प्रकरण हे मी मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात चालवलं नव्हतं. 2006 साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा भीषण दहशतवाद होता. 1993 मध्ये देखील मुंबईत आरडीएक्स वापरण्यात आलं होतं, तेच आरडीएक्स रेल्वे साखळी बॉम्बस्फोटात वापरलं (Mumbai Serial Train Blasts) होतं. याप्रकरणी असं दिसतंय की, पोलीस अधिकाऱ्यांसमो आरोपींनी जे कबुली जबाब दिले होते, त्या कबुली जबाबांच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती. अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदविण्यात आले होते.

ब्रेकिंग! मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका ; मुंबई HC चा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयात अपील

हे कबुली जबाब आणि इतर जो काही तत्सम पुरावा होता. यावर मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्विकाहार्य मानलं. त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. असं निरीक्षण मुंबई उच्चन्यायालयाने केलं. सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात अपिल करून या निर्णयाविरोधात स्थगिती मागावी लागेल. कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटात निरपराध लोक ठार झाले होते. त्यामुळे अशी रितीने आरोपींची मुक्तता होणं. न्यायालयाने खटल्यातील पुराव्यावर विश्वास न ठेवणं, या गोष्टी माझ्या मते गंभीर गोष्टी आहेत. याकरिता शासनाला देखील या निकालपत्राचं अवलोकन करून त्वरीत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल.

चुकीचा पुरावा गोळा केला

ज्या पुराव्याच्या आधारावर सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं. तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील, तर चूक कोणाची? असा सवाल देखील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी केलीय. कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली आहे की, तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता. यावर यथावकाश पोस्टमार्टम होईल. पण आज आरोपींची मुक्तता होणं, माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे, असं देखील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

 

follow us