Live Blog : वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, मोदींचे मराठीतून भाषण सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train ) गाड्या भेट देणार आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून दोन्ही हायस्पीड […]

_LetsUpp (8)

_LetsUpp (8)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train ) गाड्या भेट देणार आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून दोन्ही हायस्पीड ट्रेनला ग्रीन सिग्नल देतील.

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पीएम मोदी आज सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचे ऑनलाइन उद्घाटनही करतील. यानंतर ते शिवाजी महाराज टर्मिनस येथून आयएनएस शिक्राला जातील. येथून हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळावर पोहचतील. त्यानंतर 4.30 वाजता अल्जामिया-तुस-सैफिया (सैफ अकादमी) च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील आणि त्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होतील.

 

Exit mobile version