Download App

सुषमा अंधारे कल्याणमध्येच शिंदेंची कोंडी करणार ? स्थानिक पदाधिकाऱ्यानेच आखला ‘प्लॅन’

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Loksabha Election 2024 : मुंबईः शिवसेना फुटल्यामुळे अनेक आमदार, खासदार, माजी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे पक्ष व चिन्ह हिरावून घेणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना खिंडीत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनेक जणांचे नावे चर्चेत आहे. त्यात आता उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रॅण्ड नेत्या आणि प्रवक्ता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे नाव पुढे आले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्याने थेट उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन अंधारे यांना कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदारसंघातून उमेदवारी देण्याची गळ घातली आहे.

आमदारकी वाचवली, CM पद सेफ केले… तरीही शिंदेंनी नार्वेकरांना कोर्टात खेचले, नेमके कारण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांना राजकीय आखाड्यात कसे चितपट करायचे याचे डावपेच ठाकरे गटाकडून सुरू आहेत. त्यामुळे वजनदार उमेदवाराचा शोध सुरू आहे. मध्यंतरी तर थेट आदित्य ठाकरे यांचे नाव कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी पुढे आले होते. तर माजी आमदार सुभाष भोईर यांचे नावही अनेक दिवसांपासून चर्चेत आले. या चर्चेत आता आणखी एक नाव पुढे आले आहे ते म्हणजे सुषमा अंधारे यांचे या नावासाठी ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर हे आग्रही आहेत. श्रीकांत शिंदेंच्या तोडीचा उमेदवार असला पाहिजे, त्यासाठी अंधारेंना या ठिकाणी उमेदवारी द्यावी, अशी मागणी खामकर यांची आहे.

CM Shinde यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रात येणार, तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक

सुषमा अंधारे या फायरब्रँण्ड नेत्या उद्धव ठाकरे गटात आल्या. त्यांना थेट पक्षात उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीनुसार त्या थेट एकनाथ शिंदे यांच्या गटावर तुटून पडतात. राज्यात काढण्यात आलेल्या महाप्रबोधन यात्रेतून त्यांनी शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर थेट टीका केल्या आहेत. त्यातून शिंदे गटाचे आमदार व सुषमा अंधारे यांच्या थेट शाब्दिक युद्ध झाले आहेत. तर एकमेंकाविरुद्ध अब्रुनुकसानीच्या दावापर्यंत खटके उडाले आहेत. कुणाचेही भिडभिड त्या ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. ही प्राथमिक मागणी असली तरी यावर उद्धव ठाकरे खरेच विचारतात का? हे काही दिवसातच समोर येईल.

follow us

वेब स्टोरीज