Download App

मुंबईसाठी कॉंग्रेसकडून गोविंदा आणि राज बब्बर यांच्या नावांची चर्चा; ठाकरे गटाचाही हिरवा कंदील

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Elections 2024) काँग्रेसकडून चित्रपट अभिनेत्यांना उतरवले जाऊ शकते. यामध्ये गोविंदा आणि ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांच्या नावांची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, राज बब्बर गोविंदा यांचे सारखे अनेक लोक सध्या त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांना चांगला राजकीय अनुभव आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते. असाच संकेत पटोले यांनी यावेळी दिले.

Veg-Non veg Price : फेब्रुवारीमध्ये असं काय झालं? व्हेज महाग तर नॉन-व्हेज थाळी झाली स्वस्त

या अगोदर 2004 ला काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभासाठी गोविंदाला उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी गोविंदाने भाजपचे राम नाईक यांना पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर जरी राजकारणातून काढता पाय घेतला. त्यानंतर 2019 मध्ये काँग्रेसने याच मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. मात्र तिचा पराभव झाला. तरी यावेळी पुन्हा एकदा काँग्रेसकडून गोविंदाला उमेदवारी देण्याचे शक्यता आहे.

Congress च्या पहिल्या यादीत 15 सर्वसामान्यांसह SC-ST, OBC उमेदवारांची संख्या किती जाणून घ्या

तर राज बब्बर यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांना राजकीय अनुभव आहे. ते उत्तर प्रदेशात राजकारणात चांगले सक्रिय होते. या अगोदर ते उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद या ठिकाणी लोकसभा निवडणूक जिंकलेले आहेत. तसेच ते राज्यसभेचे देखील सदस्य होते. तरी यावेळी काँग्रेसकडून त्यांना मुंबईमध्ये उत्तर पश्चिम किंवा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते.

क्रांती रेडकरला जिवे मारण्याची धमकी, थेट पाकिस्तानशी कनेक्शन

दरम्यान या दोन अभिनेत्यांना उमेदवारी देण्यामध्ये महाविकास आघाडीमधील पक्ष असणारा उद्धव ठाकरे यांचा गट देखील सकारात्मक आहे. या दोघांचे उमेदवारीवर जागा वाटपाच्या बैठकीमध्ये सहमत झाल्याचे देखील सांगितले जाते. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून काँग्रेसला मुंबईमध्ये केवळ दोन जागा दिल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे उत्तर पश्चिम मतदारसंघातून राज बब्बर यांना उमेदवारी देण्यात आल्यास संजय निरुपम यांचं काय होणार? याची देखील सध्या चर्चा सुरू आहे.

follow us

वेब स्टोरीज