गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश पण करिश्मा-करिना कपूरही शिंदेच्या भेटीला वर्षावर; चर्चांना उधाण

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election 2024 ) पक्षांतर आणि पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत. त्यात आता या निवडणुकीमध्ये अभिनेता गोविंदा आहूजा यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री करीष्मा कपूर आणि करिना कपूर या देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहचल्या आहेत. त्यामुळे त्या देखईल राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का? अशा चर्चांना […]

Loksabha Election 2024 गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश तर करिश्मा-करिना कपूरही शिंदेच्या भेटीला वर्षावर; चर्चांना उधाण

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election 2024 ) पक्षांतर आणि पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत. त्यात आता या निवडणुकीमध्ये अभिनेता गोविंदा आहूजा यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री करीष्मा कपूर आणि करिना कपूर या देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहचल्या आहेत. त्यामुळे त्या देखईल राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

अजबच! आता पावसाच्या पाण्यावरही टॅक्स; ‘या’ देशात पुढील महिन्यापासून अंमलबजावणी

दरम्यान ज्येष्ठ अभिनेते गोविंदा, अभिनेत्री करीष्मा कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल, थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. त्यात आज फक्त सीने अभिनेता गोविंदा आहूजा यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. सीने अभिनेत्री करीष्मा कपूर आणि करीना कपूर यांचा आज पक्ष प्रवेश होणार नाही. मात्र त्या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असतील.

मविआत धुसफूस! कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, ठाकरे गटाची मागणी

तर मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविंदाचे नाव चर्चेत आहे. या मतदारसंघातून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून याच मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार असलेले गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे अमोल कीर्तीकर आणि गोविंदा यांच्यामध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे.

गोविंदाने या अगोदर 2004 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याने भाजपचे जेष्ठ नेते आणि तत्काली भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर गोविंद राजकारणापासून दूर होता. आता पुन्हा एकदा प्रक्रिया राजकारणात गोविंदाची एन्ट्री झाली आहे.

Exit mobile version