मविआत धुसफूस! कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, ठाकरे गटाची मागणी

मविआत धुसफूस! कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, ठाकरे गटाची मागणी

Pune Politics : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) घोषणा झाल्यानंतर महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) उमदेवारी जाहीर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र समोर येत आहे. धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता ठाकरे गटानेही कसबा विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

Maidaan New Song : अजय देवगणच्या मैदानचं नवं गाणं रिलीज; एआर रहमानने गायलं देशभक्तीपर गीत 

आगामी विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघ आम्हाला सोडत असाल तरच धंगेकरांचे काम आम्ही करू, असा थेट इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

आज माध्यमांशी बोलतांना संजय मोरे यांनी सांगितलं की, कसब्याच्या पोटनिवडणुकीत शिवसैनिकांनी हिरारीनं काम केलं आणि महाविकास आघाडीच्या उमदेवाराला विजयी करून दाखवलं. कसबा मतदारसंघात शिवसेना किती आक्रमक आहे हे पोटनिवडणुकीत दिसून आलं. गेल्या अनेक वर्षे हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होता. युतीत असतांना आम्ही इमान राखून भाजपचं काम केलं. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे पुणे शहरातली स्थापना ही कसबा मतदार संघातून केली. अनेक नगरसेवक कसबा मतदारसंघातनं शिवसेनेचे होऊन गेले. पोटनिवडणुकीतही आम्ही धंगेकरांचं काम आम्ही केलं. त्याच पर्यावसण महाविकास आघाडीचा उमेदवार विजय झाला, असं मोरे म्हणाले.

महाकाय ‘एना जुलिया’ अ‍ॅनाकोंडाने घेतला जगाचा निरोप; ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये आढळला मृत 

पुढं बोलतांना ते म्हणाले, आता आमदार रवींद्र धंगेकरांना लोकसभेचे महाविकास आघाडीचे पुणे शहराचे उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली. पोटनिवडणुकीत जो पॅटर्न घेऊन आम्ही काम केलं, तोच पॅटर्न घेऊन आम्ही काम करणार आहोत. त्यामुळं धंगेकर खासदार होणार याची आम्हाला खात्री आहे. पण, कसबा मतदार संघ शिवसेनेला मिळावा हे म्हणणं महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही मांडलं. ते लपून छपून मांडलं नाही. धंगेकर हे खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त आता कसबा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मिळावा. कारणं काँग्रेसकडे आता दुसरा उमेदवार असा जिंकून येण्यासारखा नाही. आमच्याकडे कसबा मतदार संघामध्ये लढणारे अनेक स्थानिक उमेदवार आहेत. कुठलाही मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार आम्हाला आणण्याची गरज नाही, अशी भूमिका मोरे यांनी मांडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube