Download App

लोकसभा निवडणुकीमुळे अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या ! अश्विनी भिडेंकडे मुंबई मेट्रो, इतरांच्या कुठे बदल्या?

Loksabha Election 2024 : राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या एकामागे एक बदल्या होत आहेत. त्यात काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ( IAS Officers Transfer ) झाल्या आहेत. त्यामध्ये नुकताच राज्य सरकारने मागणी करून देखील निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पदावरून हटवले आहे. त्यानंतर आता राज्यातील इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; ‘या’ ठिकाणी खेळणार पहिला सामना

त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालक पदालाचे जबाबदारी देण्यात आली आहे. अमित सैनि, अभियान संचालक, जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका. संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर बदली करण्यात आली आहे.

Nilesh Lanke पवारांच्या भेटीला; नगर दक्षिणसाठी लंकेंना उमेदवारी जाहीर होणार?

राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे. विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे. अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका. अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर बदली करण्यात आली आहे.

loksabha Election : पुण्याच्या जागेबाबत ट्वीस्ट; शरद पवारांनाच उभे राहण्याचा आग्रह

कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर. संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर. पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर. डॉ. कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे.

follow us

वेब स्टोरीज