Download App

आंबेडकरांचा मुंबईसाठीचा ‘माईंड गेम’ अचूक ठरला; आता लक्ष उद्याच्या घोषणेकडे…

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava)मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आणि भाजपचा हाच धोका वंचित बहुजन आघाडीनं ओळखला होता, असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केला. आणि मनसेच्या पाठिंब्यानंतर वंचितचे मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये वंचितकडून कोणते कार्ड खेळले जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कमळामुळे नव्हे तर, धनुष्यबाणामुळे लागला राज ठाकरेंच्या ‘इंजिन’ला ब्रेक!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतल्यापासून मनसे महायुतीसोबत जाणार अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. पण त्यानंतर राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे मनसे काय भूमिका घेणार यावर मुंबईमधील लोकसभांची बहुतेक गणितं अवलंबून असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी पक्क ओळखले होते. आणि त्यामुळेच वंचितकडून राज्यातील तब्बल 20 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र त्यांनी मुंबईमध्ये वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली होती.

कॉंग्रेस नेतृत्वाला ग्राउंड रिॲलिटीचे भान नसल्यानेच १७ जागा…; अशोक चव्हाणांची टीका

आता मनसेकडून भाजपला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढची राजकीय गणितं आखली जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे वंचितच्या मुंबईसह उर्वरीत लोकसभेच्या जागांवरील उमेवदवारांची यांदी उद्या गुरुवारी 11 एप्रिलला जाहीर करणार असल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत भाजपचं अभिनंदन केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सेल्फ गोल केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल. त्यांनी मुंबईमध्ये एक आंदोलन उभे केले होते, लुंगी हटाओ, पुंगी बजाओ. त्यानंतर उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन केलं. त्याच्यानंतर मनसेने धारावीसह काही भागामध्ये छटपूजेला विरोध केला. आणि बिहारमधील मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास दिला, मारले.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील जनता आणि बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात. उत्तरप्रदेशमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात. त्याचबरोबर साऊथ इंडियन कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात. की ज्यांना भाजप जवळची वाटत होती, त्यांना आता असुरक्षित वाटायला लागले आहे. आणि त्यामुळे अनेजण आता लोकसभेची उमेदवारी आम्हाला वंचितकडून करायची असल्याचे संकेत देत आहेत, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दक्षिण भारतीय, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मतदार भाजपबरोबर होता मात्र तो आता राहणार नाही, याचे संकेत गुढीपाडवा मेळाव्यानंतर आले आहेत. आणि अनेक ठिकाणी पक्षामधील उमेदवार आता पुढे येऊन निवडणूक लढवण्याची भाषा बोलत आहेत.

आता वंचित बहुजन आघाडी मुंबईमध्ये कोणते प्यादे उतरवणार हे पाहावं लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तगडी फाईट देणार उमेदवार वंचितकडून उतरवले जाणार आहेत. त्यामुळे आता वंचितकडून मुंबईमध्ये कोणते कार्ड खेळले जाणार हे पाहावे लागणार आहेत.

follow us