Download App

निवडणुकीच्या लाइव्ह कव्हरेजसाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आज तकचे पत्रकार वैभव कनगुटकर मुंबईहून बीडला रिपोर्टिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Vaibhav Kangutkar Passed away : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे. देशातील लोकसभेच्या 96 मतदारसंघात मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील 11 जागांचाही समावेश आहे. बीड मतदारसंघात लाइव्ह कव्हरेजसाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची झाल्याची समोर आली. आज तकचे व्हिडिओ जर्नालिस्ट वैभव कनगुटकर (Vaibhav Kangutkar) मुंबईहून बीडला रिपोर्टिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी हार्ट अॅटॅकचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पारनेरमधील पैसे वाटपावर अण्णा हजारे स्पष्टच बोलले, ‘पैशाच्या जोरावर देश चालला…’ 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील आज तकचे पत्रकार अभिजीत कारंडे यांच्यासह व्हिडिओ जर्मनालिस्ट वैभव कनगुटर हे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वार्तांकन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे गेले होते. ते अंबाजोगाई येथील राज हॉटेलमध्ये थांबले होते. सकाळी ते हॉटेलमधून निघाले, त्यांनी एक वॉकथ्रू शूट केला. लाइव्ह रिपोर्टिंगनंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा करुण अंत झाला. वैभव यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीच्या लाइव्ह कव्हरेजसाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

वैभव कनगुटकर हे अत्यंत शांत, संयमी आणि मृदुभाषी स्वभावाचे म्हणून कुटुंबीय, सहकारी आणि मित्रमंडळींमध्ये परिचित होते. ते ठाण्यात वास्तव्याला होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी शोकसागरात बुडाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज