Download App

उद्धव ठाकरेंचा पहिला विजय अनिल देसाईंनी खेचून आणला; शिंदेंच्या शिवसेनेच्या राहुल शेवाळेंचा पराभव

Anil Desai उद्धव ठाकरेंनी पहिला विजय खेचून आणला आहे. ठाकरे गटाचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंचा विजय झाला आहे.

LokSabha Election Result Anil Desai Win Rahul Shewale defeat : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ( LokSabha Election Result ) सुरू असून राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पुढे असताना उद्धव ठाकरेंनी ( Udhhav Thackeray ) पहिला विजय खेचून आणला आहे. ठाकरे गटाचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंचा ( Anil Desai ) विजय झाला आहे. त्यांनी शिंदेंच्या विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचा ( Rahul Shewale ) पराभव केला आहे.

Satara Loksabha : उदयनराजेंनी वचपा काढलाच! शशिकांत शिंदेंना धूळ चारली, विजयानंतर भावूक

दक्षिण मध्य मुंबईची लढत शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई होती. कारण याच भागामध्ये शिवसेनेचे पक्ष कार्यालय आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे येथील खासदार राहुल शेवाळे हे पक्ष फुटीनंतर शिंदेंसोबत गेले आहेत. त्यांना या वेळी देखील शिंदेगटाकडून उमेदवारी मिळाली होती.

ठाण्याचा बालेकिल्ला शिंदेंचाच, ठाकरेंचा शिलेदार राजन विचारे मोठ्या पराभवाकडे, नरेश म्हस्के ठरले जायंट किलर

तर ठाकरे यांनी शेवाळे यांच्या विरोधात अनिल देसाई यांना मैदानात उतरवले होते. या मतदारसंघातील निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे धारावी झोपडीच पुनर्विकास. या मुद्द्यावरून ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे यांच्या सरकारचा कडाडून विरोध केला होता. त्यासाठी आंदोलन देखील काढली होती. याचा परिणाम होण्यावर देखील या मतदार संघातील विजयावर परिणाम करणारं ठरलं असं बोललं जात आहे.

follow us

वेब स्टोरीज