नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय मुंबईत सुखरूप परतले; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत
54 Indians stranded in Nepal शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिठाई भरवून भाविकांचे स्वागत केले. यावेळी राहुल शेवाळे यांनी भाविकांशी संवाद साधला.
54 Indians Stranded in Nepal Floods Safely Return to Mumbai: नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे चीन-नेपाळ सीमेजवळ अडकलेल्या 54 भारतीय भाविकांची अखेर सुखरूप सुटका झाली असून, गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते मुंबईत पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने माजी खासदार तथा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी या भाविकांचे स्वागत केले. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत तोडगा नाहीच, जरांगे पाटील सहाव्या दिवशीही उपोषणावर ठाम
मुंबई विमानतळावर भाविकांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिठाई भरवून आणि गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत केले. यावेळी राहुल शेवाळे यांनी भाविकांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाची आणि नेपाळमधील परिस्थितीची माहिती घेतली. सुखरूप मायदेशी परतल्याबद्दल भाविकांनी महाराष्ट्र शासन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांचे आभार मानले.
Manoj Jarange : 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायत पातळीवर कुणबी नोंदी होणार ; मंत्री विखेंची मोठी घोषणा
हा 54 जणांचा समूह 22 ऑगस्ट रोजी कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये पोहोचला होता. मात्र, नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे त्यांचा परतीचा मार्ग अडचणीत आला आणि चीन-नेपाळ सीमेच्या परिसरात ते अडकून पडले. याची माहिती मिळताच काठमांडूमध्ये कार्यरत असलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षाच्या माध्यमातून राहुल शेवाळे यांनी भाविकांशी संपर्क साधला.
World Cup 2027 रोहित शर्मा खेळणार का? बीसीसीआयने दिली चाहत्यांना मोठी बातमी
भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार, भारतीय दूतावास आणि नेपाळ दूतावास यांच्याशी समन्वय साधण्यात आला. दरम्यान, राहुल शेवाळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे भाविकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. विशेष प्रयत्नांनंतर या 54 भाविकांना काठमांडू येथे सुरक्षितपणे आणण्यात आले. त्यानंतर गुरुवारी विमानाने त्यांना मुंबईत आणण्यात आले.
मिठाईसाठी फक्त शुद्ध चांदीचाच वर्क; सण- उत्सवांच्या काळात तुकाराम मुंढेंचे नवे आदेश
राहुल शेवाळे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला होता. महापुरामुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी या कक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. 54 भाविक मुंबईत पोहोचेपर्यंत आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. या नागरिकांना सुरक्षितपणे घरी परत आणता आल्याचा आनंद असून, हा प्रसंग शिवसेनेच्या समाजसेवेच्या परंपरेला अधोरेखित करणारा आहे.”