Devendra Fadanvis On CM Change Rumors : राष्ट्रवादीतील बंडानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजितदादांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी असे कोणतेही बदल होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही या चर्चा काही केल्या थांबतांना दिसत नाहीये. त्यात आता फडणवीसांनी आपली जबाबदारी बदलणार नसल्याचे सांगत सीएम बदलण्याचा सस्पेंन्स क्लिअर केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे साईड ट्रॅकवर जात असलेल्या एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला आहे. ते विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीनंतर बोलत होते.
संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा मर्डर करेन, सुबोध सावजींची खुलेआम धमकी…
फडणवीस म्हणाले की, राज्यातील जनतेने अनेक विक्रम पाहिले आहेत. 2019 मध्ये तर अनेक राजकीय विक्रमांची नोंद झाली. त्यात शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत अजितदादा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. हे सर्व पचनी पडत नाही तोच आता अजित पवार पुन्हा दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या येण्याने सीएम शिंदेंचे पद धोक्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत.
‘तिकडे जाऊ नका, परत इकडेच या’ : वडेट्टीवारांचे अभिनंदन अन् अनेक टोमणे; अजितदादांनाही हसू आवरेना
आतापर्यंत राजकीय नेत्यांनी आणि सोबत जनतेनेही अनेक राजकीय विक्रम बघितले. पण आता राज्यात कोणताही बदल होणार नाहीये. एवढेच काय तर, माझ्या जबाबदारीतही कोणताही बदल होणार नसल्याचे फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले. फडणवीसांच्या या भूमिकेमुळे काही काळासाठी का होईना सीएमपदाबाबत टांगती तलवार असलेल्या एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अजितदादांकडूनही खंडन
एकीकडे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उत आलेला असताना खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या चर्चांचे खंडन केले आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना अजितदादा म्हणाले होते की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असून, मी आणि फडणवीस दोघेही उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी तर नीट पार पाडू द्या. कार्यकर्त्यांचं समाधान होण्याकरता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असावेत असे म्हणत भूमिका स्पष्ट केली होती.