Download App

मुख्यमंत्री होण्याबद्दल जयंत पाटील यांच मोठ विधान; म्हणाले, मला जनतेने यावेळी आशीर्वाद दिले तर…

जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. "राजकारणात असणाऱ्या

  • Written By: Last Updated:

Jayant Patil on CM Post : एकीकडे प्रचार जोमात चालू असताना दुसरीकडे (Jayant Patil ) महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण यावरही वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्त्व देण्याचं विधान केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते जंयत पाटील यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.

जनतेने मला आशीर्वाद दिला तर

जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. “राजकारणात असणाऱ्या प्रत्येकाचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. मी एकूण सात वेळा मी विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे. आता ही आठवी वेळ असेल. जनतेने मला आशीर्वाद दिला तर माझा विजय होईल. जनता यावेळीही मला आशीर्वाद देईल असं चित्र दिसत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. तसंच, इच्छा तर प्रत्येकाचीच असणार आहे. त्यात काही वावगं नाही. परंतु, 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी संख्या ठरेल. त्यानंतर आपण या मुख्यमंत्रिपदावर बोलूया, असंही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राचा पुढचा सीएम कोण? उद्धव ठाकरेंनी घेतलं जयंत पाटील अन् आव्हाडांचं नावं

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कारण काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जातात. शरद पवार यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यावर नेतृत्त्व सोपवण्यासंबंधीचे विधान केलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) पक्षही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहे.

अनेक नेते इच्छुक

असं सगळ चित्र असताना आता जयंत पाटील यांनीदेखील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं सूतोवाच केलं आहे. दरम्यान, असंच एक मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारलं असताना इच्छूक असल्याचेच संकेत दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आलीच तर नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us