महाराष्ट्राचा पुढचा सीएम कोण? उद्धव ठाकरेंनी घेतलं जयंत पाटील अन् आव्हाडांचं नावं…

  • Written By: Published:
महाराष्ट्राचा पुढचा सीएम कोण? उद्धव ठाकरेंनी घेतलं जयंत पाटील अन् आव्हाडांचं नावं…

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुक (Vidhansabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) किंवा महायुती (Mahayuti) कुणीही मुख्यमंत्री जाहीर केलेला नाही. त्यामुळं निवडणुकीनंतर राज्यात कुणाचं सरकार कुणाचं येणार? आणि कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवारांच्या (Sharad Pawar) दोन नेत्यांची नाव घेत त्यांनी थेट पाठिंबाच दर्शवला.

कलाटेंसाठी शरद पवार चिंचवडमध्ये, ‘वस्ताद’ काय करणार याकडे सर्वांचे लक्ष? 

माझ्या मनात मुख्यमंत्री व्हायचं असं अजिबात नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवारांच्या दोन नेत्यांची नाव घेत त्यांना पाठिंबा दिला.

उद्धव ठाकरेंनी मुंबई तकला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारल्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, शरद पवारांच्या जर जास्त जागा आल्या तर त्यांच्या मनात जर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा आणखी कुणाचं नाव असेल तर त्यांनी जाहीर करावं. काँग्रेसने जाहीर करावं, मी जाहीर करेन. मला फक्त सत्तेत महाराष्ट्राचे लुटारू नकोत, त्यांनी माझ्या पाठीत वार केला, याचा मला राग आहे. पण याचा अर्थ मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे नाही, असे ठाकरे म्हणाले.

गोध्रा दंगलीत पाकिस्तानचा सहभाग? साबरमती रिपोर्ट्समध्ये होणार मोठा खुलासा  

संधी मिळाली तर मुख्यमंत्री होणार का? असा सवाल केला असता ठाकरे म्हणाले की, माझी इच्छा असणं किंवा नसण्यापेक्षा जनतेची इच्छा महत्त्वाची आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाशी यांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखांमुळेच यांजी आज पंचतारांकित शेती आहे. ही कुणाच्या जोरावर झाली? तुम्ही आयुष्यात काय करू शकला असता? तुम्हाला ज्यांनी संगळं दिलं, त्यांनाच भाजपने फसवलं म्हणून मी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. आधी पाच वर्ष आम्ही जेव्हा भाजपसोबत होतो, तेव्हा याच टिकोजीरावांनी भर सभेत भाजप नको म्हणून राजीनामा दिला होता, असं ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube