मुख्यमंत्री असताना कराडसाठी फुटकी कवडी दिला का ? देवेंद्र फडणवीसांचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल

  • Written By: Published:
मुख्यमंत्री असताना कराडसाठी फुटकी कवडी दिला का ? देवेंद्र फडणवीसांचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल

Mahrashtra Assembly Election: महायुती सरकारने केलेली कामे आम्हीच केल्याचे सांगण्याची वेळ पृथ्वीराज चव्हाण (
Prithviraj Chavan) यांच्यावर आलीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिलेल्या पैशांतून झालेला कराडचा उड्डाणपूल मीच केल्याचेही ते सांगत आहेत. ही प्रवृत्ती बरी नव्हे. मुख्यमंत्री असताना शिवाजी स्टेडियमसाठी त्यांनी फुटकी कवडीही दिली नाही. अतुलबाबांच्या मागणीवरून मी शंभर कोटी दिले आहे. केलेल्या कामांचे श्रेय जनताच देत असते; ते मागावे लागत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ती वेळ आली असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.

माझी बदनामी करण्यासाठी दिल्लीवरून चार एजन्सी आणल्यात, भरसभेत डॉ. अतुलबाबा भोसले कडाडले

कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी भगवंत खुबा, खासदार उदयनराजे भोसले, जेष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, उत्तराताई भोसले, गौरवीताई भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव उपस्थित होते.

खरंतर पुणे कोल्हापूर महामार्गाच्या कामाचे खरे श्रेय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात तब्बल 60 वर्ष सत्ता असताना काँग्रेसने नेमका काय विकास केला, हे सांगावे. कराड दक्षिणमध्येही याहून काही वेगळी परिस्थिती नाही. याठिकाणी आनंदराव चव्हाण, प्रेमिलाकाकी चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या चव्हाण कुटुंबीयांकडे लोकप्रतिनिधित्व असताना त्यांनी कराड दक्षिणसाठी काय केले असा सवाल फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे प्रचारात त्यांच्याकडे सांगायला विकासकामांचे मुद्देच नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

50 वर्षे सत्तापद घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी काहीच केलं नाही; डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल

झोपडपट्टी वासियांना पक्की घरे
मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी असलेली जागा संबंधितांच्या नावावर करून त्याठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यात काही अडथळे आल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्री असताना जमीन खाजगी मालकीची असली, तरी त्याची मालकी संबंधितांना देऊन त्याठिकाणी घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता डॉ. अतुलबाबा यांनी केलेल्या मागणीची दखल घेत कराडच्या पाटण कॉलनी व मलकापुरातील झोपडपट्टीवासीयांना आपण पक्की घरे बांधून देऊ. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत अतुलबाबा पक्क्या घरात राहणाऱ्या लोकांकडेच मते मागतील. असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

दक्षिणेत मोठे उद्योग येतील
भोसले कुटुंबियांनी वैद्यकीय विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक, पतसंस्था, अन्य शिक्षण समूहाच्या माध्यमातून आरोग्य सुविधेसह मोठी रोजगार निर्मिती केली केल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, करोना काळातही त्यांनी सातारा व सांगली जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार लोकांचा जीव वाचवण्याचे काम केले. आता कराडच्या एमआयडीसीला आपण फाईव्ह स्टार दर्जा देणार असून याठिकाणी मोठे उद्योग येतील. त्या माध्यमातूनही लोकांच्या हाताला रोजगार मिळेल. यासाठी डॉ. अतुलबाबांना जनतेने विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.
मी निवडून आलो.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, काँग्रेसच्या याच भूमिकांमुळे बालेकिल्ला राहिलेला सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे आता कराड दक्षिणमध्येही परिवर्तन अटळ असून मी ज्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकलो. त्याचवेळी खरंतर अतुलबाबांचा विजय झालेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपमुळे माजी मुख्यमंत्र्यांवर बिकट वेळ
कराड दक्षिणमध्ये वाढलेल्या भाजपच्या ताकदीमुळे माजी मुख्यमंत्र्यांना शनिवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, पाटण कॉलनी सोडता येईना. एवढी त्यांच्यावर बिकट वेळ आली आल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, वडील, मातोश्री व स्वतः मंत्री, मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना स्वतःच्या घरासमोरील झोपडपट्टी हटवता आली नाही. उलट झोपडपट्टीचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी आपल्या घराच्या कंपाउंडच्या भिंती उंचावून घेतल्याची टीकाही त्यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube