माझी बदनामी करण्यासाठी दिल्लीवरून चार एजन्सी आणल्यात, भरसभेत डॉ. अतुलबाबा भोसले कडाडले

माझी बदनामी करण्यासाठी दिल्लीवरून चार एजन्सी आणल्यात, भरसभेत डॉ. अतुलबाबा भोसले कडाडले

Devendra Fadnavis Sabha For Atul Bhosale : कराड दक्षिणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान आज कराडच्या मलकापूर येथे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली आहे. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, मला माहित होतं की जीवनात कठीण मार्ग निवडताना गुरू मोठा पाहिजे. 2014 सालच्या निवडणुकीत मी मोठा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने मी निवडणूक लढवली. परंतु, यशापर्यंत पोहोचू शकलो नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात अनेक विकासाची कामं करण्यात आली.

यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, समृद्धी महामार्ग हे कामं देवेंद्रजी यांच्या कारकि‍र्दीत झाली. या मतदारसंघातील जनतेने सातत्याने त्यांच्यावर प्रेम केलंय. 2019 च्या निवडणुकीत (Assembly Election 2024) पुन्हा आपण यशापर्यंत पोहोचलो नाही. पण आपण कामं करत राहिलो. लोकांचे उंबरे झिजवत राहिलो, असं प्रतिपादन डॉ. अतुलबाबा यांनी केलंय. महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षांमध्ये एकही विकासाचं काम या मतदारसंघात झालं नाही, महायुतीचं सरकार आल्यानंतर अडीच वर्षांत 700 कोटींचा निधी मतदारसंघात आणण्यात यशस्वी झालो, असं डॉ. अतुलबाबा यांनी प्रतिपादन केलंय.

50 वर्षे सत्तापद घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी काहीच केलं नाही; डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, आमची छोटीशी मागणी आहे. झोपडपट्टी वासियांना पक्की घरं देण्याची मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. पाटण कॉलनीचे पैलवान आहेत, त्यांना पक्की घरं देण्याची मागणी देखील केलीय. कराडला एमआयडीसीचा विस्तार, कराडमधील तरूण-तरूणीच्या हाताला काम देण्यासाठी रोजगाराची पूर्तता करा. मोठी गुंतवणूक येथे उद्योगधंदे आणा, जेणेकरून हाताला काम मिळेल, अशी देखील मागणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलाय. सहकारी पाणी पुरवठा योजनांना मदत करणारा प्रस्ताव देखील सादर करणार असल्याचं डॉ. अतुलबाबा भोसले भरसभेत म्हणाले आहेत.

शरद पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर अन्याय केला; कराडमध्ये अमित शाह कडाडले

देवेंद्रदादांनी निस्वार्थपणे या मतदार संघातील जनतेवर प्रेम केलंय. कधीही या मतदारसंघामधील नागरिकांची निराशा त्यांनी होवू दिलेली नाही. माझी बदनामी करण्यासाठी दिल्लीवरून चार एजन्सी आणल्या आहेत. तुम्ही स्वत:ला मोठे नेते समजता. मग माजी मुख्यमंत्र्‍यांच्या प्रचाराला माजी राज्यमंत्री जातात का? असा सवाल भरसभेत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलाय. 2019 सालापासून 2024 पर्यंत काय विकासकामं केली? ते सांगा. मला एकदा संधी द्या, मी चांगलं काम करवून दाखवेन, असं आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मतदारांना केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube