शरद पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर अन्याय केला; कराडमध्ये अमित शाह कडाडले
Amit Shah Sabha for Atul Bhosale in Karad : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्यामध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रिय मंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) जाहीर सभा घेतली. ही सभा लातूरमधील विंग येथे पार (Assembly Election 2024) पडली. यावेळी अमित शहांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांचे आभार मानत यशवंतराव चव्हाण यांचं देखील स्मरण केलंय.
मागच्या निवडणुकीच्या वेळी मी आलो होतो, परंतु तेव्हा कराडकरांनी काम अधुरं ठेवलं होतं. पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तुम्ही अतुल भोसले यांना आमदार बनवा, त्यांना मोठं व्यक्ती बनवण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं आहे, असं अमित शाह म्हणाले आहेत. 2019 मध्ये भाजप-सेना युतीला बहुमत मिळालं होतं. जनादेश मिळाला होता, परंतु त्याच्यासोबत विश्वासघात देखील झाला होता. परंतु यावेळी आम्ही कोणतीही चूक करणार नाही. यावेळी महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं येईल, असं भर सभेत अमित शाह म्हणाले आहेत.
छगन भुजबळ असं काहीच बोलले नाहीत; पुस्तकातील दावे चर्चेत येताच अजितदादा उतरले मैदानात
सातारा जिल्हा विरांची भूमी आहे. आजही अनेक तरूण जवान बनून प्राणांची आहुती द्यायला तयार असतात. नरेंद्र मोदी नेहमीच सेनेच्या जवांनाचा सन्मान करतात. इंदिरा गांधीने वन रॅंक, वन पेन्शनचं वचन दिलं होतं. 40 वर्ष कॉंग्रेसचं सरकार होतं, परंतु वन रंक -वन पेन्शनचं वचन पूर्ण नाही झालं. ही वचनपूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. राहुल गांधी खोटं बोलण्याची फॅक्टरी आहेत, असं अमित शाह म्हणालेत. अग्निवीर परत आल्यानंतर त्यांना सरकारी पेन्शनची नोकरी दिली जाईल, असं आश्वासन अमित शाहंनी भरसभेत दिलंय. नरेंद्र मोदी जे बोलतात, ते करतात.
Video : निवडणूक संपताच फडणवीसांची ‘सुप्त’ इच्छा पूर्ण करणार; जाहीर सभेत मोदींनी दिला शब्द
पन्नास-पन्नास वर्ष तुम्ही एकाच कुटुंबातील निवडणून दिलं, पण आज कराड विकासाच्या यादीत मागे आहे. एक वर्षाच्या अगोदरच सर्व गरिबांच्या घराची कामं पू्र्ण करा. त्या लोकार्पण सोहळ्यात मी स्वत: गरिबांना त्यांच्या घरांची चावी द्यायचं काम करेन, असं अमित शाह अतुल भोसले यांना म्हणाले आहे. शरद पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर अन्याय केलाय, असा आरोप अमित शाह यांनी केलाय. अतुल भोसले यांना बहुमताने विजयी करा, मोदींजींचे हात भक्कम करा, असं आवाहन अमित शाह यांनी मतदारांना केलंय.