Video : निवडणूक संपताच फडणवीसांची ‘सुप्त’ इच्छा पूर्ण करणार; जाहीर सभेत मोदींनी दिला शब्द

  • Written By: Published:
Video : निवडणूक संपताच फडणवीसांची ‘सुप्त’ इच्छा पूर्ण करणार; जाहीर सभेत मोदींनी दिला शब्द

PM Modi promise to Devendra Fadnavis महाराष्ट्रात वाढवण बंदराचे उद्घाटन नुकतेच मी केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी मी यावर काही बोललो नाही. मात्र, निवडणुका संपताच फडणवीसांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करण्याचा शब्द मोदींनी दिला आहे. (PM Modi) ते म्हणाले की, ज्यादिवशी आचारसंहिता संपेल आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल, त्यादिवशी मी वाढवण बंदरासह विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा कशी पूर्ण होते, त्यावर एकत्र बसून निर्णय घेईल.

कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची गरज, पण विरोधकांनी साठ वर्षापर्यंत प्रकल्प रोखला; PM मोदींचे टीकास्त्र

उद्घाटनावेळी काय म्हणाले होते फडणवीस?

मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी झाला आहे. कारण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट आहे. त्यामुळे आपण नंबर वन ठरलो आहोत. आता त्यापेक्षा तिप्पट मोठं बंदर वाढवणमध्ये होत आहे. या बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होते. पण ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे. मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आले आणि वाढवण बंदर सुरू करण्याच्या कामाला वेग आला, असं फडणवीस म्हणाले होते.

१२ लाख रोजगार निर्मिती

हे बंदर भारत मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉरच्या माध्यमातून व्यापारातही उपयुक्त ठरणार असल्याचं बोललं जातय.  एकदा पीएम गतिशक्ती कार्यक्रमात समाविष्ट केलेले हे बंदर तयार झाले की, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे १२ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी शक्यता सरकारने वर्तविली आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube