महाराष्ट्रात CM पदाचा चेहरा कोण असणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ज्या पक्षाला जास्त…’

महाराष्ट्रात CM पदाचा चेहरा कोण असणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ज्या पक्षाला जास्त…’

Prithviraj Chavan : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. अशात बुधवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिल्लीत इंडिया आघाडीच्या (India Aghadi) नेत्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली. त्यावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केलं.

Old Money: एपी ढिल्लॉनच्या गाण्यात भाईजानचा जबरदस्त ॲक्शन सीन, संजू बाबाने जिंकली चाहत्यांची मन 

ज्या पक्षाला जास्त जागा, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मुख्यमंत्रीपदाविषयी विचारले असता चव्हाण म्हणाले, निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही कोणताही चेहरा समोर ठेवत नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एखाद्या चेहऱ्याची गरज नाही. कारण, आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत. त्यानंतर आम्ही सत्तेत येऊन आमचा जाहीरनामा पूर्ण करणार आहोत. ज्यावेळी आघाडी म्हणून निवडणुक लढवली जाते, त्यावेळी ज्या पक्षाचे आधिक उमेदवार निवडुन येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, असा संकेत आहे. मग ते मुख्यमंत्रीपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं, ते त्या त्या पक्षातील नेते ठरवतील, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

धक्कादायक, गुजरातमधील शिक्षिका 8 वर्षांपासून अमेरिकेत करते मौज अन् दरमहा खात्यात जमा होतो सरकारी पगार 

उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असा दावा संजय राऊतांनी केला होता. याविषयी विचारले असता चव्हाण म्हणाले की,
संजय राऊत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत जे काही बोललेत त्यावर मी काही बोलणार नाही.

अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या. विधानसभेच्या 288 जागांपैकी महाविकास आघाडीला 183 जागा मिळत आहेत. मात्र, यावर आम्ही समाधानी नसून अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करू, असंही चव्हाण म्हणाले.

महाविकास आघाडीचे जागा वाटप लवकर झाले पाहीजे. जागावाटप लवकर झाल्यास उमेदवारांना लवकर कामाला लागता येईल. लवकर प्रचार सुरु करता येईल, असंही चव्हाण म्हणाले.

लाडकी बहिण योजना आताच का आठवली?
लाडकी बहिण योजनेवरून चव्हाण यांनी महायुती सरकावर जोरदार टीका केली.
दहा वर्षे त्यांना लाडकी बहीण आठवली नाही का? लोकसभा निवडणुकीनंतरच त्यांना ही योजना का आठवली, असा सवाल त्यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube