Download App

कोण होणार CM? अमित शहा-तावडेंची खलबतं; आज दिल्लीत बैठक, धक्कातंत्राचीही भीती

आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Maharashtra Chief Minister : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार इतकं स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपने जोरात हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस हेच (Devendra Fadnavis) सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परंतु, त्यांच्याऐवजी दुसरा एखादा मुख्यमंत्री दिला तर.. याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. याच अनुषंगाने काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची चर्चा झाली. तसेच आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Maharashtra Politics : तुम्ही मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांना पत्रकारांना जोडले हात, तिन्ही पक्ष 

मराठा मुख्यमंत्री दिला तर..

एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतु, बिगर मराठा चेहरा दिल्यास याचा मराठा मतांवर परिणाम काय परिणाम होऊ शकतो याची चाचपणी तावडे आणि शहा यांच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे. परंतु तरीही जर फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घ्यायचाच असेल तर मराठा मतं कशी टिकवता येतील.

फडणवीसांचा चेहरा आणि मराठा ओबीसा मतं, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात मराठा समाजाची विविध आंदोलनं, मराठा नेत्यांच्या भूमिका, न्यायालयाचे निकाल या बाजूही अमित शाह यांनी जाणून घेतल्या. तसेच पक्षाची राज्यातील वाटचालीसाठी मराठा चेहरा किती महत्वाचा आहे याबाबतही राजकीय आकडेमोड करण्यात आली.

आज दिल्लीत बैठक, धक्कातंत्राची धास्ती

राज्याचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा करण्यासाठी आज राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. सध्या तरी फडणवीसांचाच दावा प्रबळ मानला जात आहे. मात्र तरी देखील ऐनवेळी दुसरेच नाव समोर येईल का अशी शंकाही भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याबाबत विचारले असता फडणवीस यांनी काहीच न बोलता फक्त हात जोडले.

आमच्यात मतभेद नाहीत, निर्णय सोबत बसूनच होईल; फडणवीसांनी क्लिअर केलं 

follow us