Maharashtra Elections 2024 : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे (Maharashtra Election) वाहू लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी दबावाचं राजकारण सुरू केला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून मतदारसंघांवर दावा ठोकला जात आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीत 85 जागा लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले. त्यानंतर आता शिंदे गटानेही भाजपच्याच (BJP) स्ट्रॅटेजीनुसार काम करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपाने जागावाटपात जी स्ट्रॅटेजी वापरली तीच स्ट्रॅटेजी आता शिंदे गटाकडून (Eknath Shinde) विधानसभा निवडणुकीत वापरली जाईल या शक्यतेला बळ देणाऱ्या घडामोडी घडत आहेत. याची सुरुवात मुंबईतून (Mumbai) झाली आहे.
एकनाथ शिंदेंचा विधानसभेत राहुल गांधींना टोला; आलू डाल, सोना निकालो
लोकसभा निवडणुकीत मोठ्या मुश्किलीने शिंदे गटाला पंधरा जागा मिळाल्या होत्या. यांपैकी सात जागा निवडून आणल्या. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षाही चांगला राहिला. त्यामुळे आता शिंदेसेनेचा उत्साह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त नमतं घ्यायचं नाही उलट आक्रमकपणा दाखवत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या असं नियोजन शिंदेसेनेचं दिसत आहे.
नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा जागांवर शिंदे गट दावा सांगणार आहे. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांची मागणी आमचा पक्ष करील असे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले. तसं पाहिलं तर या दोन्ही मतदारसंघात आजमितीस भाजपाचे आमदार आहेत. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आहेत तर बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे आमदार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
आता या दोन्ही मतदारसंघांवर शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत सर्वेचे कारण पुढे करत भाजपाने शिंदे गटाच्या हक्काच्या जागांवर दावा सांगितला होता. तसेच काही ठिकाणी उमेदवार बदलण्यासही भाग पाडलं होतं. त्यामुळे जागा मिळवताना शिंदेंना बरीच कसरत करावी लागली होती.
पाणी, नाणी, वाणी नासू नये; तुकोबारायांचा अभंग अन् जयंत पाटलांची ‘दादा’, शिंदेंवर फटकेबाजी
प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र शिंदेंच्या शिवसेनेची कामगिरी भाजपपेक्षाही सरस राहिली. 28 जागा लढणाऱ्या भाजपला फक्त 9 जाग जिंकता आल्या. त्याचवेळी 15 जागा लढवून सात जागा जिंकण्याचं काम शिंदेंच्या शिवसेनेनं केलं. आता स्ट्राईक रेट पाहिला तर यात शिंदेंच्या शिवसेननं भाजपला मात दिली. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात आक्रमक धोरण घेण्याचं शिंदे गटाने ठरवल्याचं दिसत आहे.