Download App

पाणी, नाणी, वाणी नासू नये; तुकोबारायांचा अभंग अन् जयंत पाटलांची ‘दादा’, शिंदेंवर फटकेबाजी

पाणी, नाणी, वाणी नासू नये, असा अभंग म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपममुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फटकेबाजी केलीयं. ते विधिमंडळात बोलत होते.

Jayant Patil On Aji Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्टाईलने संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणत सत्ताधाऱ्यांवर फटकेबाजी केलीयं. यावेळी बोलताना पाणी, वाणी, नाणी नासू नये, असा टोला जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावलायं.

पोलिसांची नोकरी सोडून सत्संग करणारे भोले बाबा कोण आहे? एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण इतिहास

जयंत पाटील विधिमंडळात बोलत असताना त्यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावरुन ताशेरे ओढले आहेत. भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, घासावा शब्द तासावा शब्द… तोलावा शब्द बोलण्यापूर्वी..बोलावे मोजके, खमंग, खमके..ठेवावे भान देश काळात पात्राचे..बोलावे बरे बोलावे खरे..कोणाच्याही मनावर पडू नये चरे..कोणाचेही वर्म, वर्ण अन् बिंग..जात-पात, धर्म काढूच नये..जिभेवरी ताबा सर्व सुख दाता..पाणी, वाणी, नाणी नासू नये! असा अभंग म्हणत जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर टीका केलीयं.

तुम्हाला हे शोभत नाही; मोदींच्या भाषणात गोंधळ घालणाऱ्या राहुल गांधींना ओम बिर्लांनी खडसावले

तसेच पाणी, नाणी, आणि वाणी वाया घालवू नका असा संदेश तुकाराम महाराजांनी दिलायं. वाणीबद्दल तर काही बोलायलायच नको, मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण आपण ऐकलेलचं आहे. राज्यात पाणी वाया चाललं आहे. नाणीबद्दल बोलायंच झालं तर निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी दिलायं, पण इंद्रायणी, भीमा नद्यांची अवस्था वाईट झालीयं, नदीचं पाणी जनावरेही पीत नाहीत. वारीचा मूळ आत्माच या दोन नद्या आहेत. अजित पवार यांनी काहीही केलेलं नसल्याची टीका जयंत पाटील यांनी केलीयं.

“साहेब, तुमचा शब्द खरा केला, उबाठा तीन नंबरवर”; दराडेंनी CM शिंदेंना काय सांगितलं?

आम्ही भाजपचा 2019 सालचा जाहीरनामा वाचला आहे. सरकारने या जाहीरनाम्यात दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणताच आमदार संजय कुटे यांनी जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गोंधळ केला. यावर जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर बोलण्याची विनंती केली.

दरम्यान, यावेळी बोलताना पाटलांनी गरीब की थाली मे पुलाव आ रहा है, लगता है राज्य मे चुनाव आ रहा है, असे म्हणत जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने फक्त घोषणांचा पाऊस केल्याची टीका केलीयं.

follow us