“साहेब, तुमचा शब्द खरा केला, उबाठा तीन नंबरवर”; दराडेंनी CM शिंदेंना काय सांगितलं?

“साहेब, तुमचा शब्द खरा केला, उबाठा तीन नंबरवर”; दराडेंनी CM शिंदेंना काय सांगितलं?

MLC Elections 2024 : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकी शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी मोठ्या विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे संदीप गुळवे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या एन्ट्रीने ही निवडणूक तिरंगी झाली होती. विवेक कोल्हे यांनीही जोरदार टक्कर देत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. आता निवडणूक निकालानंतर किशोर दराडेंनी सीएम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेला शब्द खरा करुन दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विजयी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडेंना फोन केला. यावेळी दोघांत चर्चा झाली. शिंदेंनी त्यांचे अभिनंदन केले. भाऊ चौधरी यांच्या फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दराडेंशी चर्चा केली. यावेळी दराडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. साहेब, तुमचा शब्द खरा केला. उबाठा तीन नंबरवर. महाविकास आघाडीचा पराभव करून मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो, असे दराडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडेंची विजयाकडे वाटचाल, कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर

नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली. या निवडणुकीत तिघांत जोरदार लढत होती. तिन्ही उमेदवारांत फेरीगणिक रस्सीखेच सुरू होती. मतमोजणीसाठी तीन टेबलवर झाली. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. मतमोजणी तब्बल तीस तास सुरू होती.

पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या प्रमाणेच दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांतही दराडेंनी आघाडी घेतली होती. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या दोघांमध्येच अटीतटीची लढत पाहण्यास मिळाली. निवडणुकीचे निकाल हाती आले तेव्हा शिंदे गटाच्या किशोर दराडेंनी विजय मिळवला होता तर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

कोण होणार शिक्षक आमदार?, नाशिक विभागात आज मतमोजणी, प्रशासन सज्ज

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज