नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे-विवेक कोल्हेंमध्ये चुरस; गुळवे तिसऱ्या क्रमांकावर
Nashik Teacher Constituency counting Kishore Darade-Vivek Kolhe: मुंबई पदवीधर व शिक्षक दोन्ही मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्या असून, दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. तर कोकण पदवीधर मतदारसंघात तिसऱ्यांदा भाजपच्या निरंजन डावखरे यांनी बाजी मारली आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Teachers Constituency) मात्र जोरदार चुरस दिसून येत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade), महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली आहे. पहिल्या फेरीत किशोर दराडे हे 1775 मतांनी आघाडीवर होते. पण दुसऱ्या फेरीत ही आघाडी विवेक कोल्हे यांनी कमी केली आहे. दुसऱ्या फेरीत दराडे यांना 400 मतांची आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर विवेक कोल्हे आहेत. आता तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. त्यात एकाही उमेदवाराने पन्नास टक्के मते आणि एक मत (कोटा) न मिळविल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मोजण्यात येणार आहेत.
मोठी बातमी! मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी; डावखरेंनी ‘कोकण’ राखले !
पहिल्या फेरीत आमदार दराडे यांना 11 हजार 145, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना 9 हजार 370, ठाकरे गटाचे अॅड. संदीप गुळवे यांना 7 हजार 077 मते मिळालेली आहेत. दुसऱ्या फेरीत किशोर दराडे यांचे मताधिक्य घटले आहे. दुसऱ्या फेरीच्या आकडेवारीनुसार दराडे आता 438 मतांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या फेरीअखेर किशोर दराडे यांना 22 हजार 346 मते आहे. तर विवेक कोल्हे यांना 21 हजार 907 इतके मते आहेत. तर संदीप गुळवे यांना 16 हजार 809 मते मिळाले आहेत. उमेदवारांच्या विजयाचा कोटा पूर्ण नसल्याने दुसऱ्या क्रमांकाचे मते मोजली जाणार आहेत.
मतमोजणीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मतदारांना चुकीचे मत दिले आहे. ते बाद ठरवावे, अशी मागणी मतमोजणी प्रतिनिधी करत आहेत. मतदारांनी मतदान करताना चुका केल्या आहेत. काही अंक मराठीत, तर काही अंक इंग्रजीमध्ये लिहिले आहे. त्यामुळे गोंधळ होत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ हा अनेक कारणांमुळे गाजला आहे. उमेदवारांची संख्या जास्त होती. त्यात मतदारांना वेगवेगळे प्रलोभने दाखविली जात होती. शिक्षकांना महागडे कपडे, पैठणी, सोन्याचे नथ देण्यात आली होती. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली.