जे शिक्षकच नाहीत त्यांना शिक्षकांचे प्रश्न काय समजणार?, भाऊसाहेब कचरेंचा विवेक कोल्हेंवर हल्लाबोल

जे शिक्षकच नाहीत त्यांना शिक्षकांचे प्रश्न काय समजणार?, भाऊसाहेब कचरेंचा विवेक कोल्हेंवर हल्लाबोल

Legislative Council Elections : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी येथे 26 तारखेला मतदान होणार आहे. मात्र ,तत्पूर्वी आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. (Legislative Council Elections) जे दुसरे काही उमेदवार उभे आहेत त्यांनी कधी हातात खडू घेतला नाही असेही उमेदवार आहेत. किंबहुना ते शिक्षक देखील नाहीत. या उमेदवारांना फक्त आमदार व्हायचंय बाकी शिक्षणाच्या प्रश्नांची यांना काही घेणं देणं नाही. हे विवेक कोल्हे शिक्षक नाही व त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांचा कुठलाही गंध नाही अशा शब्दांत टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांनी (Vivek Kolhe) विवेक कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल केला.

पक्षीय स्वरूप आले गृहमंत्र्यांवर आरोप केले की भाजपचे लोक नाराज होतात; पुणे अपघात अन् नीट पेपर लिकवरून सुप्रिया सुळेंची टीका

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघांमध्ये शिक्षकांच्या विविध संघटना उमेदवार उभे करत आहेत. या मतदारसंघात शिक्षक आणि संस्थाचालकांना उमेदवारी करता येत होती. मात्र, आता यंदाच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी देखील या निवडणुकीत उडी घेतल्याने या निवडणुकीला कुठेतरी आता पक्षीय स्वरूप आले आहे. शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएफचा आम्हाला पाठिंबा असल्याच्या घोषणा सर्व उमेदवारांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे संभ्रमाची अवस्था देखील निर्माण झाली आहे. यावर देखील कचरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काम काय केली हे त्यांना धड सांगता येईना

किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्ये आले. ते आपण विविध कामं केली असं सांगत आहेत. मात्र, नेमकी काय काम केले हे देखील त्यांना सांगता येत नाही. दराडे यांनी जर खरंच शिक्षकांसाठी कामं केली असती तर मुख्यमंत्र्यांना येण्याची वेळच पडली नसती असा टोलाही यावेळी कचरे यांनी लगावला.  गेली सहा वर्ष दराडे यांनी कामच केले नाही. गेल्या निवडणुकीत शिक्षकांना प्रलोभन दाखवण्यात आली तीच यंदाही कायम आहेत असही कचरे यावेळी म्हणाले आहेत.

अधिकृत उमेदवारी आरक्षणासाठी काय लागतं? याचा अभ्यास करा, ती खिरापत नाही; जरांगेंच्या आरोपांना हाकेंचं पुन्हा जोरदार उत्तर

टीडीएफमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी संदीप गुळवे तसंच विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी मुलाखत दिली. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.  मला जी उमेदवारी दिली ती अधिकृत असल्याचा दावा  देखील कचरे यांनी केला. तसं पत्रही त्यांनी यावेळी दाखवलं. केवळ टीडीएफ चा आपल्याला पाठिंबा आहे आशा व वलग्ना करत आहेत असंही ते म्हणाले.

कोल्हे तर शिक्षकच नाही फक्त आमदार व्हायचंय

या शिक्षक निवडणुकीमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, कोल्हे हे काही शिक्षक नाही. शिक्षकांच्या चळवळीचा तसेच शिक्षकांच्या प्रश्नांचा त्यांना कुठलाही गंध नाही. त्यांच्याशी संबंधित असलेले जे मंडळी आहेत. जे शिक्षक कार्यकर्ते आहेत जे टीडीएफ संबंधित आहेत, ते त्यांच्यासोबत गेल्याने टीडीएफ त्यांच्या सोबत आहेत असं सभ्रम निर्माण केला जातोय असंही कचरे यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube