नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली; आरोप-प्रत्यारोप करत दराडे-कोल्हे आमने-सामने

नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली; आरोप-प्रत्यारोप करत दराडे-कोल्हे आमने-सामने

Nashik Teacher Constituancy Darade Kolhe Criticize each other : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये (Nashik Teacher Constituancy) चांगली चुरस निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीचे आणि शिवसेनेचे विद्यमान शिक्षक आमदार तसेच उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) आणि अपक्ष उभे असलेले विवेक कोल्हे ( Vivek Kolhe ) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

रविंद्र वायकरांचा विजय हा एक आदर्श घोटाळा; अनेकांचं नावं घेत राऊतांची थेट चौकशीची मागणी

या दरम्यान नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली असताना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरात रविवारी (दि.16 जून) पत्रकार परिषद घेऊन विरोधी उमेदवाराने केलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याचा खुलासा केला. मागील निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रान्वये असलेले गुन्हे न्यायप्रविष्ट असून, त्यानंतर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तर डमी उमेदवाराचे कोणत्याही प्रकारे दबाव टाकून अथवा अपहरण केले गेले नसल्याचा खुलासा केला.

Manoj Jarange: फडणवीस दुश्मन नाही; 13 जुलैचा उल्लेख करत जरांगेंनी सस्पेन्स वाढवाला

सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्‍न सोडवून कोणताही स्पर्धक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरला नसल्याने साखर सम्राटांमध्ये भिती निर्माण झाली असल्याने ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला नाव न घेता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना लगावला. आरोप करणाऱ्यांनी सरकारकडून 117 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिकमध्ये कोल्हेंच्या एन्ट्रीने लढत तिरंगी…

नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी कमी झाल्या आहेत. नगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आपण आजवर पहिला आहे. आता पुन्हा एकदा हे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने येणार होते.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांना शह देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे हे आता सरसावले होते. परंतु, त्यांनी माघार घेतल्याने ही संभाव्य लढत टळली आहे. तरीही या मतदारसंघात 21 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, महायुतीचे किशोर दराडे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यातच तिरंगी लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज