Legislative Council Elections : भाजपच्या हक्काच्या दोन जागा गेल्या, नाशिकमध्ये तांबेची ‘जीत’

Legislative Council Elections : भाजपच्या हक्काच्या दोन जागा गेल्या, नाशिकमध्ये तांबेची ‘जीत’

मुंबई: राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अनेक रंग पाहायला मिळाले आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला असला तरी भाजपला मात्र दोन ठिकाणी जबरदस्त धक्का बसले आहेत. ते ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यात. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचा पाठिंबा असलेले उमेदवार नागो गाणार हे पराभूत झाले.

या मतदारसंघात मविआचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झालेत. मविआचे सुधाकर अडबाले यांना 14 हजार 71 मते मिळाली असून भाजपचे नागो गाणार यांना 6 हजार 309 मते मिळाली आहेत. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत सुरू आहे. तेथे दुसऱ्यांदा उमेदवारी करत असलेले डॉ. रणजीत पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत. तेथे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयाकडे वाटचाल करत आहेत.

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धिरज लिंगाडे 2378 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रणजित पाटील चौथ्या फेरीतही पिछाडीवर पडले आहेत. चौथ्या फेरीत धिरज लिंगाडे यांना 43340 मते भाजपचे रणजित पाटील यांना 41027 मते मिळाली आहेत. या दोन्ही जागा जिंकण्याची क्षमता असताना भाजपला मात्र पराभवाचा झटका बसला आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी गोंधळ होता. भाजपमध्ये नागपूरला गोंधळ झाला. भाजपने ऐनवेळी गाणार यांना पाठिंबा द्यावा लागला. तेथे भाजप नेत्यांनी सभाही घेतल्या होत्या. जोरदार ताकद लावली तरी हक्काच्या दोन जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात ही राष्ट्रवादी काँग्रेस विक्रम काळे ही विजयी झाले. त्यात राष्ट्रवादी बंडखोरी पाहिला मिळाली.

त्यानंतरही भाजपला किरण पाटील यांना यश मिळवता आले नाही. दुसरीकडे नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ही विजयी झाले आहे. त्यांना ६० हजारपेक्षा जास्त मते मिळाली आहे. तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. येथे मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथे भाजपच उमेदवार नव्हता.

प्रत्यक्षपणे तांबेंना पाठिंबा दिला नव्हता. आतून मात्र भाजपच्या नेत्यांनी मदत केल्याचे बोलले जात आहे. भाजपने कोकणातील एक जागा जिंकली असली तरी विदर्भातील बालेकिल्ल्यातील दोन्ही जागा भाजपने गमविल्या आहेत. मराठवाड्यात भाजप व शिंदे गटाची ताकद असताना तेथे भाजपला कोणता करिश्मा करता आलेला नाही. कोकण मतदारसंघात म्हात्रे विजयी झालेत हाच एक दिलासा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube