आरक्षणासाठी काय लागतं? याचा अभ्यास करा, ती खिरापत नाही; जरांगेंच्या आरोपांना हाकेंचं पुन्हा जोरदार उत्तर

आरक्षणासाठी काय लागतं? याचा अभ्यास करा, ती खिरापत नाही; जरांगेंच्या आरोपांना हाकेंचं पुन्हा जोरदार उत्तर

Lakshman Hake on Manoj Jarange for Reservation : मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण (Reservation) मिळायला पाहिजे असं ठामपणे सांगत आहेत. त्यावर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी लढा देणारे लक्ष्मण हाकेंनी (Lakshman Hake) जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही. आरक्षणासाठी काय करावं लागतं? काय गरज आहे? याचा जरांगे यांनी अभ्यास करावा. असं म्हणत हाकेंनी जरांगेंना उत्तर दिलं आहे.

52 खासदारांची हॅट्ट्रीक, 2 दिग्गज आठव्यांदा घेणार शपथ; लोकसभेत नव्या-जुन्यांची मांदियाळी

तसेच ते पुढे म्हणाले की, फक्त कुणबी या नोंदी असतील तर त्यांना कोणी रोखू शकत नाही. कारण मंडल आयोगात कुणबी आहेतच. कुणबी दाखले रद्द करता येत नाही. पण मराठा लिहिलं त्या पुढे कु लावयच, कुणबी हा प्रवर्ग वेगळा आहे. खानदेश कुणबी गिरणा नदीच्या किणाऱ्यावर राहतात. खऱ्या कुणबी यांचं राहणीमान वेगळं आहे. मनोज जरांगे यांना मंडल आयोग कधी निर्माण झाला काही माहिती नाही. घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगाला बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत.

…तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल; ‘ही’ नवी मागणी करत मनोज जरांगे पटलांचा सरकारला थेट इशारा

त्यामुळे जरांगे यांनी जनतेच्या दरबारात जावं. मुख्यमंत्री, आमदार, खासदार कधी तुमचे नव्हते. तुम्ही आरक्षणाचा अभ्यास करा, त्या साठी काय करावं लागतं, काय गरज आहे त्याची याचा जरांगे यांनी अभ्यास करावा. जी गोष्ट कधी होण शक्य नाही, ती मागणी ते करताय. आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही. हे काय शासन आहे का, लिहून द्यायला. बलूत्यांच्या नावावर जमीन नाहीत. 10 टक्के आरक्षण देताना सरकार ने केलेलं सर्वेक्षण 100 टक्के बोगस आहे. हे सर्वेक्षण गायकवाड आयोगापेक्षा बोगस आहे.असं म्हणत हाकेंनी जरांगेंना फटकारलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज