गृहमंत्र्यांवर आरोप केले की भाजपचे लोक नाराज होतात; पुणे अपघात अन् ‘नीट’ पेपर लिकवरून सुप्रिया सुळेंची टीका

गृहमंत्र्यांवर आरोप केले की भाजपचे लोक नाराज होतात; पुणे अपघात अन् ‘नीट’ पेपर लिकवरून सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule : नीटच्या परीक्षेत सातत्याने घोळ होत आहेत. (Accident) याबाबत मी ‘एसआयटी’ची मागणी केली आहे. (Supriya Sule) तर, नवीन लोकसभेत शेतकरी प्रश्न आणि नीटची परीक्षा आणि आरक्षणाच्या याविषयवरच आम्ही महाविकास आघाडीचे 30 खासदार आणि देशातील इंडिया आघाडीच्या वतीने सविस्तर चर्चा आम्हाला हवी आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. (Neet) त्या कोंढवे- धावडे येथे कार्यक्रमाच्या निमित्त आल्या असता माध्यमांशी बोलत होत्या.

आता दूध प्यायचं नाही का? तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल; नवी मागणी करत मनोज जरांगे पटलांचा सरकारला थेट इशारा

जीएसटी कौन्सिलमध्ये दुधावरील वाढीचा प्रस्ताव दिला आहे. याप्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीने कोण गेलं होतं. महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींनी याचा विरोध का नाही केला, कारण आम्ही याबाबत केंद्रात प्रश्न विचारतो. त्यावेळी आम्हाला राज्यातील लोक येथे येतात. असं उत्तर दिले जात असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. तसंच, महाराष्ट्र राज्याने काय भूमिका घेतली आहे. याचं उत्तर मला अपेक्षित आहे. हा निर्णय होत होता तेव्हा महाराष्ट्र सरकार जीएसटी कौन्सिलमध्ये काय करत होतं, हे होऊच कसं दिलं, लहान मुलांनी आता दूध प्यायचं नाही का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

माझ्यावर नाराज होतात NEET Scam: सुबोध कुमारांना हटवले ! प्रदीप सिंह खरोला एनटीएचे नवे संचालक

मंचरमध्ये एका राजकीय व्यक्तीच्या पुतण्याच्या गाडीने दोन जणांना धडक दिली आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात ‘हिट अँड रण’च्या केस वाढत चाललेले आहेत. मी राज्यातील गृहमंत्र्यांवर आरोप केले की, भारतीय जनता पार्टीचे लोक माझ्यावर नाराज होतात. परंतु, राज्यात ड्रग, पोर्शे कार सारख्या दुर्घटना वाढत आहेत. अशावेळी सत्तेमध्ये आहे त्यांना एक न्याय आणि सामान्य माणसाला एक न्याय आहे अशी भावनाही सुप्रिया यांनी यावेळी बोलून दाखवली.

सविस्तर चर्चा करण्याची मागणी

आता जी अपघाताची घटना घडली आहे. त्याचीही चौकशी झाली पाहिजे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजघटनेच्या नुसारच चालणार आहे. कोणाचीही मनमानी चालणार नाही. अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात शेतकरी प्रश्न आणि नीटची परीक्षा आणि आरक्षणाचा विषय या विषयावर आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने सविस्तर चर्चा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज